पती झाला हैवान! शेजाऱ्याकडे टोमॅटो मागितला म्हणून पत्नीला दिली भयंकर शिक्षा, झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 16:54 IST2022-12-09T16:49:15+5:302022-12-09T16:54:26+5:30

पत्नी शेजाऱ्याकडे टोमॅटो मागण्यासाठी जात असल्याने पतीने हे धक्कादायक पाऊल उचललं आहे.

Crime News tomato sauce tamaatar kee chatanee wife murder | पती झाला हैवान! शेजाऱ्याकडे टोमॅटो मागितला म्हणून पत्नीला दिली भयंकर शिक्षा, झालं असं काही...

पती झाला हैवान! शेजाऱ्याकडे टोमॅटो मागितला म्हणून पत्नीला दिली भयंकर शिक्षा, झालं असं काही...

पती पत्नीत छोट्या-मोठ्या गोष्टींवरून सतत वाद होत असतात. काही वाद हे टोकाला जातात. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पत्नीने शेजाऱ्याकडून टोमॅटो मागितल्याने पतीने चक्क पत्नीला बेदम मारहाण करत तिची हत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. 

पत्नीची हत्या केल्याने पतीला अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भेडीमुडा गावात ही भयंकर घटना समोर आली आहे. पोलीस अधीक्षक अभिषेक मीणा यांनी दिेलेल्या माहितीनुसार, 50 वर्षांच्या भगत राम अगरिया याने दांड्याने पत्नीला मारहाण करुन तिचा जीव घेतला. कारण त्याने शेजाऱ्याकडून टोमॅटो मागण्यास मनाई केली होती. 

पत्नी शेजाऱ्याकडे टोमॅटो मागण्यासाठी जात असल्याने पतीने हे धक्कादायक पाऊल उचललं आहे. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू केली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा पती फरार होता. पण पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली. कोर्टात हजर केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपीच्या वडिलांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सून टोमॅटो मागण्यासाठी शेजाऱ्याकडे जात होती. मुलाने मनाई केल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर मुलाने बाहेरून काठी आणून सूनेला मारहाण केली. यावेळी गंभीर दुखापत झाल्याने सूनेचा मृत्यू झाला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला अधिक तपास करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Crime News tomato sauce tamaatar kee chatanee wife murder