Crime News: पप्पु कलानी यांच्या भावाच्या घरी चोरी, नोकराने रोख रक्कमेसह दागिने केले लंपास

By सदानंद नाईक | Updated: October 12, 2022 17:55 IST2022-10-12T17:55:11+5:302022-10-12T17:55:36+5:30

Crime News: माजी आमदार पप्पु कलानी यांचे मोठे भाऊ नारायण कलानी यांच्या घरातील कपाटातून ५ लाख रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असे एकून ६ लाख २५ हजाराची रक्कम नोकराने लंपास केली

Crime News: Theft at Pappu Kalani's brother's house, servant looted jewelery along with cash | Crime News: पप्पु कलानी यांच्या भावाच्या घरी चोरी, नोकराने रोख रक्कमेसह दागिने केले लंपास

Crime News: पप्पु कलानी यांच्या भावाच्या घरी चोरी, नोकराने रोख रक्कमेसह दागिने केले लंपास

- सदानंद नाईक 
उल्हासनगर : माजी आमदार पप्पु कलानी यांचे मोठे भाऊ नारायण कलानी यांच्या घरातील कपाटातून ५ लाख रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असे एकून ६ लाख २५ हजाराची रक्कम नोकराने लंपास केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस नोकरचा शोध घेत आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-२ खेमानी परिसरातील कलानी महल येथे माजी आमदार पप्पु कलानी यांचे मोठे भाऊ नारायण कलानी हे कुटुंबासह राहतात. त्यांच्या घरात काम करणारा कृष्णकांत पारथी हा नोकर कामाला होता. ४ सप्टेंबर २०२२ रोजी घरातील कपाटातून ५ लाख रोख रक्कमेसह सोन्याच्या अंगठ्या, ब्रेसलेट असे एकून ६ लाख २५ हजाराचा ऐवज त्याने चोरून नेला. चोरीचा प्रकार तब्बल एक महिन्यानंतर उघड झाल्यावर, सोमवारी १० ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात नारायण कलानी यांनी तक्रार दाखल झाली. उल्हासनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून कृष्णकांत पारथी या नोकरचा शोध घेत आहेत.

Web Title: Crime News: Theft at Pappu Kalani's brother's house, servant looted jewelery along with cash