शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: पत्नीला परपुरुषाच्या मिठीत पाहिले आणि पतीचे माथे फिरले, दिली क्रूर शिक्षा आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 19:21 IST

Crime News: बिहारमधील पूर्णिया येथे एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका घरात या महिलेचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत सापडला.

पाटणा - बिहारमधील पूर्णिया येथे एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका घरात या महिलेचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत सापडला. याबाबत माहिती मिळताच एसडीपीओ सुरेंद्र कुमार सरोज, ठाणे प्रभारी अनिल कुमार यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच या हत्याकांडाचा तपास सुरू केला. घटनास्थळावर पोलिसांना एक चिठ्ठीही मिळाली. त्यामध्ये पती असताना परपुरुषाशी संबंध ठेवण्याचा हाच परिणाम होतो, असं लिहिलं होतं.

या पत्राच्या खाली नीरज असं नाव लिहिलेलं होतं. नीरज हे मृत कल्याणी हिच्या पतीचं नाव आहे. पतीने या महिलेची वजनदार हत्याराने वार करून हत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. मृत महिलेचा मोबाईलसुद्धा पतीकडे आहे. एसडीपीओ सुरेंद्र कुमार सरोज यांनी सांगितले की, या हत्येचा संशय हा पतीवरच आहे. त्यांनी सांगितले की, मृत महिला कल्याणीचं सासर बडहरा कोठी ठाण्याच्या क्षेत्रात आहे. मृत महिला येथे एका खासगी एक्स रे सेंटरमध्ये काम करत होती.

शनिवारी संध्याकाळी कल्याणीसोबत राहणारी तिची मैत्रीण जेव्हा घरी आली तेव्हा तिने कल्याणीचा मृतदेह घरात पडलेला पाहिला. त्यानंतर याची सूचना घरमालकाला देण्यात आली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, एक महिन्यापूर्वीच या महिलेच्या चार वर्षांच्या मुलाला आजोबांनी आपल्याकडे नेले होते. दरम्यान, हत्या झाली त्या दिवशी कल्याणीचा पती नीरज तिथे आला होता. त्यानेच कल्याणीची हत्या केली आणि मोबाईल घेऊन फरार झाला, असा संशय आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार