Crime News: अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी सहा तासांच्या आत ठोकल्या बेड्या

By मुरलीधर भवार | Updated: August 18, 2022 21:28 IST2022-08-18T21:27:55+5:302022-08-18T21:28:21+5:30

Crime News: कल्याण स्थानकातून एका अडीच वर्षीय मुलाचे अपहरण करणा:या दोन आरोपींना कल्याण जीआरपी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहय्याने सहा तासांच्या आत बेडय़ा ठोकल्या आहेत.

Crime News: The two who kidnapped a two-and-a-half-year-old child were handcuffed by the police within six hours | Crime News: अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी सहा तासांच्या आत ठोकल्या बेड्या

Crime News: अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी सहा तासांच्या आत ठोकल्या बेड्या

- मुरलीधऱ भवार
कल्याण - कल्याण स्थानकातून एका अडीच वर्षीय मुलाचे अपहरण करणा:या दोन आरोपींना कल्याण जीआरपी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहय्याने सहा तासांच्या आत बेडय़ा ठोकल्या आहेत. पूजा मुंडे आणि अमित शिंदे अशी या आरोपींची नावे असून हे दोघे मुले चोरणा:या रॅकेटशी संबंधित आहेत का या अंगाने पोलिस तपास करीत आहेत.

कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर एक फिरस्ता महिला संजू राजवंशी ही तिच्या अडीच वर्षाच्या मुलाला सोडून वडापाव घेण्यासाठी कॅन्टीनच्या दिशेने गेली. ती पुन्हा परत आले. तेव्हा त्याठिकाणी तिचा अडीच वर्षाचा मुलगा अक्षय त्याठिकाणी नव्हता. हे पाहून तिला धक्काच बसला. तिने मुलाची शोधाशोध सुरु केली. अखेर मुलगा न सापडल्याने तिने कल्याण जीआरपी गाठले. कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अविनाश आंधळे, पोलिस निरिक्षक अर्चना दुसाणो आणि पोलिस अधिकारी प्रमोद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुलाचा शोध सुरु झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही पाहिला. तेव्हा पोलिस हैराण झाले. या मुलाला एक महिला आणि एक पुरुष घेऊन गेले असल्याचे दिसून आले. पोलिस अधिकारी प्रमोद देशमुख यांनी तपासाचे चक्र फिरविले. सहा तासाच्या आत मुलगा अक्षय याची सुटका करीत.

दोन्ही अपहरणकर्ते अमित शिंदे आणि पूजा मुंडे या दोघांना उल्हासनगरातून ताब्यात घेतले. हे दोघे सध्या किरकोळ काम करतात. असे ते सांगत आहेत. मात्र ते मुले चोरीचे काम करतात का हे दोघे कोणत्या रॅकेटशी संबंधित आहेत का या अंगाने तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अविनाश आंधळे यांनी सांगितले आहे. आपल्या मुलाला अवघ्या सहा तासात पोलिसांनी शोधून काढले. तसेच अपहरण करणा:यांना बेडया ठोकल्याने मुलाची आई संजू हिच्या चेह:यावर हास्य फुलले. तिचा जीव भांडय़ात पडला आहे. तिने पोलिसांचे आभार मानले आहे.

Web Title: Crime News: The two who kidnapped a two-and-a-half-year-old child were handcuffed by the police within six hours