Crime News: जबरीने सोनसाखळी हिसकावून लुटारुंनी ठोकली ‘धूम’, अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By चैतन्य जोशी | Updated: September 11, 2022 15:21 IST2022-09-11T15:21:09+5:302022-09-11T15:21:50+5:30
Crime News: अज्ञात दोन दुचाकीस्वार लुटारुंनी महिलेला धसका देत तिच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने हिसकावून नेत धूम ठोकली. ही घटना वझुरकर लेआऊट आलोडी परिसरात घडली. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती

Crime News: जबरीने सोनसाखळी हिसकावून लुटारुंनी ठोकली ‘धूम’, अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चैतन्य जोशी
वर्धा : अज्ञात दोन दुचाकीस्वार लुटारुंनी महिलेला धसका देत तिच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने हिसकावून नेत धूम ठोकली. ही घटना वझुरकर लेआऊट आलोडी परिसरात घडली. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. याप्रकरणी १० रोजी रात्रीच्या सुमारास सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. अर्चना अजय वानखेडे रा. सहयोगनगर पिपरी मेघे या एम.एच. ३२ ऐ.क्यू. ७५६१ क्रमांकाच्या दुचाकीने यमुना लॉन परिसरात गरबा कार्यक्रमानिमित्त गेल्या होत्या.
तेथून त्या मानकर लेआऊट आलोडी येथील गिरीश कांबळे यांच्या घरी कार्यक्रमानिमित्त जात असताना आलोडी परिसरात असलेल्या भेंडे कॅटरर्सच्या फलकाजवळ दोन अज्ञात दुचाकीस्वार आले. त्यापैकी एकाने अर्चनाच्या दुचाकीसमोर दुचाकी आडवी लागून दुसऱ्याने धसका देत गळ्यातील १० ग्रॅम वजनाची ४२ हजार रुपये किंमतीची सोनसाखळी हिसकावून दुचाकीने पळ काढला.
याप्रकरणी अर्चना वानखेडे यांनी तत्काळ सेवाग्राम पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत अज्ञात लुटारुंविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे करीत आहेत.