शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ऐनवेळी वराचे संबंध उघड; मारहाण करत लग्न मोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 13:07 IST

गुजरातमधून थेट नवरीला फोन, वराला कोठडी.

मलकापूर : चार महिन्यांपूर्वी ठरलेल्या लग्नाच्या ऐन पूर्वसंध्येला वराच्या चारित्र्याबद्दल वधूकडील मंडळीला माहिती मिळाल्याने नवरीने त्याला जाब विचारला असता, नियोजित वराने नवरीसह तिच्या घरच्या मंडळींना धक्काबुक्की करत लग्न मोडण्याचा प्रकार मलकापुरात शनिवारी सायंकाळी घडला. या प्रकरणी नवरोबाविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मलकापुरातील एका मुलीचे मोताळा तालुक्यातील बोराखेडी येथील अमोल गणेश पारेकर याच्याशी १ मे रोजी लग्न ठरले होते. तो गुजरातमधील सुरत येथे रेल्वेत लोको पायलट पदावर कार्यरत आहे. ३० एप्रिल रोजी वधू पक्षाकडील मंडळींना गुजरातमधून दूरध्वनीद्वारे माहिती मिळाली. त्यामध्ये होणाऱ्या जावयासोबत विवाहितेचे अफेअर असल्याची माहिती संबंधित व्यक्तीने दिली. त्यासाठी पुरावा म्हणून गुजरातमधील विवाहितेसोबतचे अमोल पारेकर याचे फोटो नवऱ्यामुलीच्या मोबाईलवर पाठवले. फोटो पाहून वधू पक्षाकडील मंडळीला हादरा बसला. 

नियोजित वराकडून फसवणूक होत असल्याचे पाहता नवरीने फोन करून अमोल पारेकरला जाब विचारला. त्यावेळी त्याच्या  बोराखेडी येथील घरी नानमुखाची तयारी सुरू होती. दारातील मांडवात नवरदेवाला हळद लागलेली होती. नवरीने जाब विचारल्याचा राग आल्याने हळद लागलेला, हातावर मेहंदी काढलेला नवरदेव काही जणांना घेऊन मलकापुरातील नवरीच्या घरी पोहोचला.  

नवरीचे केस ओढलेनवऱ्या मुलीचे केस ओढून आता लग्न करत नाही, आपले लग्न तुटले, असे म्हणत निघून गेला. या प्रकाराची तक्रार मुलीच्या आईने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी नवरदेव अमोल पारेकर याच्यासह त्याच्या कुटुंबातील ११ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी नानमुखाच्या दिवशी लगीन घरातून नवरदेवाची वरात थेट पोलीस ठाण्यात आणली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्न