शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

Crime News: एकमेकींना न ओळखणाऱ्या सवती भेटल्या आणि रचला पतीच्या हत्येचा कट, शूटरही मागवला आणि अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 09:25 IST

Crime News: दिल्ली परिवहन निगमच्या एका कर्मचाऱ्याच्या झालेल्या हत्येच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, सदर व्यक्तीच्या दोन पत्नींनी मिळून त्याच्या हत्येचा कट रचला.

नवी दिल्ली - दिल्ली परिवहन निगमच्या एका कर्मचाऱ्याच्या झालेल्या हत्येच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, सदर व्यक्तीच्या दोन पत्नींनी मिळून त्याच्या हत्येचा कट रचला. दरम्यान, हत्येनंतर पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली सदर कर्मचाऱ्याची पत्नी, माजी पत्नी आणि मुलीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपींची ओळख सदर डीटीसी कर्मचाऱ्याची पहिली पत्नी गीता (५४), मुलगी कोमल (२१) आणि दुसरी पत्नी गीता ऊर्फ नजमा (२८) अशी पटली आहे.

सदर डीटीसी कर्मचाऱ्याची पत्नी, माजी पत्नी आणि मुलगी मागच्या दोन-तीन वर्षांपासून त्याची हत्या करण्यासाठी कट रचत होत्या.  हत्येनंतर तपास अधिकाऱ्यांनी मृताची दुसरी पत्नी नजमा हिच्या मोबाईलवर एका व्यक्तीच्या नंबर प्लेटचा एक डिलीट केलेला फोटो मिळाला आहे. डीटीसीच्या या कर्मचाऱ्याच्या सहा जुलै रोजी गोळी मारून हत्या करण्यात आली होती. हत्या करण्यात आली तेव्हा तो दुसरी पत्नी आणि मुलासोबत बाईकवरून जात होता.

दरम्यान, या डीटीसी कर्मचाऱ्याच्या हत्येसाठी त्याची दुसरी पत्नी नजमा हिचा चुलत भाऊ इक्बाल याने मदत केली. त्याच्याकडे हत्येसाठी एक मारेकरी शोधण्याचे काम सोपवण्यात आले होते. इक्बालने नयूम नावाच्या एका शूटरला यासाठी तयार केले. त्याला या कर्मचाऱ्याची हत्या करण्यासाठी १५ लाख रुपये देण्यात आले.

या हत्येबाबत डीसीपी ईशा पांडे यांनी सांगितले की, संजीवची दुसरी पत्नी नजमा हिला सुमारे दोन तीन वर्षांपूर्वी त्याची पहिली पत्नी आणि मुलांबाबत माहिती मिळाली. त्यानंतर तिने त्यांच्याशी संपर्क साधला. पती संजीव तिला शिविगाळ करायचा. तसेच मारहाण करायचा, असा दावा  नजमा हिने तपासात केला. तसेच संजीव कुमार याने आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, असे या महिलांनी चौकशीमध्ये सांगितले. तसेच त्याची हत्या करून त्याची संपत्ती आपापसात वाटून घेण्यासाठी त्याची हत्या करण्याचा कट रचला असेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली