शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

Crime News: नणंद करायची चुगल्या, संतापलेल्या वहिनीने टोकाचे पाऊल उचलले, आधी चाकूने वार केले आणि मग विहिरीत ढकलून दिले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 17:51 IST

Crime News: पोलिसांनी हत्येच्या एका धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा करत मृत तरुणीच्या वहिनीला अटक केली आहे. आरोपी वहिनीला तिच्या नणंदेची चुगल्या करण्याची सवय आवडत नव्हती. त्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलत आपल्या नणंदेची हत्या केली. 

भोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर जिल्ह्यात पोलिसांनी हत्येच्या एका धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा करत मृत तरुणीच्या वहिनीला अटक केली आहे. आरोपी वहिनीला तिच्या नणंदेची चुगल्या करण्याची सवय आवडत नव्हती. त्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलत आपल्या नणंदेची हत्या केली. एक ऑक्टोबर रोजी भानपुरामध्ये राहणारी १४ वर्षीय हर्षिता अचानत बेपत्ता झाली होती. खूप शोधाशोध केल्यानंतर ती घराजवळ असलेल्या छोट्या विहिरीत तिचा मृतदेह सापडला होता. त्याबाबत तिचे वडील सुरेश यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.

त्यानंत पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला होता. तपासामद्ये मृत तरुणीच्या गळ्यावर आणि नाकावर जखमांच्या गंभीर खुणा आढळल्या. तसेच तिच्या शॉर्ट पोस्टमार्टेममध्ये मृत्यूच्या आधी तिला जखम झाल्याचे आणि पाण्यात बुडाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

याबाबत घरातील लोकांकडे चौकशी करण्यात आली. तसेच मृत तरुणीच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यात आले. तसेच पोलिसांनी घटनास्थळाचे बारीक निरीक्षण केले. तपासादरम्यान, कुटुंबीयांनी मृत तरुणीच्या २२ वर्षीय वहिनीवर संशय घेतला. तेव्हा वहिनी रश्मी हिची चौकशी केली असता तिने गुन्हा कबुल केला. तिने सांगितले की, लग्नानंतर तिची नणंद दिवसभर गप्पागोष्टी करून तिचा पती ऐश्वर्य आणि सासऱ्यांना सांगत असे.

एक ऑक्टोबर रोजी आरोपी वहिनी आणि नणंद आंधळी कोशिंबिर खेळत होते. त्याचवेळी वहिनीने नणंदेवर चाकूने वार केले. त्यानंतर तिला फरफटत विहिरीजवळ नेले आणि तिला विहिरीत ढकलून दिले. गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी वहिनीला तिच्या नणंदेची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार