शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

भुसावळातील खून प्रकरणी एकाला सात वर्षे सक्तमजुरी

By चुडामण.बोरसे | Updated: September 5, 2022 17:44 IST

पाच वर्षांपूर्वी विसर्जन मिरवणुकीत घडली होती घटना

भुसावळ: श्री विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादातून ललित हरि मराठे याचा खून झाला होता. या प्रकरणी आरोपी गोली उर्फ राजेंद्र उर्फ गणेश सुभाष सावकारे (२५, रा. न्यू एरीया वार्ड, तुळजापूर मंदिराजवळ, भुसावळ) याला सात वर्षे सक्तमुजरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. जाधव यांनी सोमवारी हा निकाल दिला. विशेष म्हणजे पाच वर्षापूर्वी पाच सप्टेंबर रोजी याच दिवशीची खुनाची घटना घडली होती आणि पाच सप्टेंबर रोजीच या खून खटल्याचा निकालही लागला.

५ सप्टेंबर २०१७ रोजी शहरात श्री विसर्जन मिरवणूक सुरु होती. त्यात न्यू इंडिया सब्जी मंडळाचा कार्यकर्ता ललित मराठे (२६, रा. न्यू एरीया वार्ड, तुळजापूर मंदिराजवळ, भुसावळ) व आरोपी गणेश सावकारे सावकारे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. मिरवणूक बाजारपेठ पोलीस स्थानकाजवळ आली असता ललित मराठे याच्यावर गणेश सावकारे याने छातीच्या डाव्या बाजूस धारदार चाकूने वार केले होते. यात ललित मराठे याचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी ललित याचा आते भाऊ धीरज मराठे याने बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी भुसावळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली.    सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले.  यात आरोपीस सात वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची अशी शिक्षा सुनावण्यात आली.  दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा होणार आहे. या खटल्यात  सरकारतर्फे सहाय्यक ॲड. प्रवीण भोंबे यांनी तर फिर्यादीतर्फे ॲड. प्रफुल्ल आर. पाटील यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार धनसिंग राठोड व सहाय्यक फौजदार शेख रफिक शेख कालू यांनी मदत केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळJalgaonजळगावjailतुरुंग