शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अजबच! 15 दिवसांत दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला काँग्रेसचा नेता; पोलिसांनी मंडपातून घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 19:37 IST

Crime News : नैतिक चौधरी असं या नेत्याचं नाव असून पोलिसांनी त्याला दुसऱ्यांदा लग्न करताना पकडलं आहे. तसेच आता ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात गुरुवारी एक अजब घटना घडली. मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेत मिळणाऱ्या लाभाच्या हव्यासापोटी एनएसयूआयच्या राष्ट्रीय समन्वयकाने चक्क दुसऱ्यांदा विवाह केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे त्याचा पहिला विवाह  हा 15 दिवसांपूर्वीच झाला होता आणि तेही लव्ह मॅरेज. नैतिक चौधरी असं या नेत्याचं नाव असून पोलिसांनी त्याला दुसऱ्यांदा लग्न करताना पकडलं आहे. तसेच आता ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. याच दरम्यान भाजपाने काँग्रेसला टोला लगावला आहे. यासोबतच यावरून निशाणा साधला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सागरमधील बालाजी मंदिर परिसरात सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात 135 जोडप्यांनी विवाह केला. एनएसयूआयचे राष्ट्रीय समन्वयक नैतिक चौधरी यांना मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेच्या अंतर्गत मिळणारा लाभ हवा होता. त्यामुळे नैतिक चौधरी पत्नीला घेऊन दुसऱ्यांदा लग्न करण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याला पोहोचले. नैतिक चौधरींना मंडपात पाहून कोणीतरी याची माहिती आयोजकांना दिली. त्यानंतर आयोजकांनी याची सूचना पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीनं सोहळ्यास्थळी येऊन नैतिक चौधरींना ताब्यात घेतलं.

नैतिक चौधरींना पोलीस ठाण्यात नेलं. नैतिक चौधरींचा विवाह दोनच आठवड्यापूर्वी धूमधडाक्यात संपन्न झाला होता. पोलीस नैतिक यांना पोलीस ठाण्यात नेत असताना पत्नीदेखील त्यांच्यामागे धावली. दुसऱ्यांदा विवाह करायला नको, असं पत्नीनं नैतिक यांना सांगितलं होतं. पोलीस आता नैतिक चौधरींची चौकशी करत आहेत.

मध्य प्रदेश भाजपाचे माध्यम प्रभारी लोकेंद्र पराशर यांनी या प्रकरणावरून ट्विट करत जोरदार निशाणा साधला. "हे श्रीमान एनएसयूआयचे राष्ट्रीय समन्वयक आहेत. मुख्यमंत्री कन्यादान योजनेचा लाभ घेण्यासाठी दुसऱ्यांदा विवाह करण्यास जात होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. काय म्हणता कमलनाथजी!" असा टोला पराशर यांनी लगावला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसmarriageलग्न