शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नात येऊन 'ती' घाबरवते! पोलीस कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं; गळफास घेऊन जीवन संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 12:53 IST

Crime News : सतत पडणारी वाईट स्वप्ने आणि भुताच्या भीतीतून एका पोलिसाने गळफास घेतला.

नवी दिल्ली - रात्री झोपेत असताना अनेकांना वाईट स्वप्न पडतात. यातील काही स्वप्न ही अस्वस्थ करणारी असतात. त्याचा मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे. वाईट स्वप्न अन् भुताच्या भीतीने एक बळी घेतला आहे. स्वप्नात येऊन 'ती' घाबरवते असं म्हणत एका पोलीस कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं. गळफास घेऊन आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. तामिळनाडूमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सतत पडणारी वाईट स्वप्ने आणि भुताच्या भीतीतून एका पोलिसाने गळफास घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्ह्यात ही घटना घडली आहे. प्रभाकरन असं आत्महत्या केलेल्या 33 वर्षीय पोलिसाचं नाव आहे. प्रभाकरन विवाहित असून त्याला एक मुलगा आणि मुलगी आहे. ते कुड्डालोरमधील पोलीस क्वार्टरमध्ये राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रभाकरनला भूताची भीती वाटत असल्याने त्याने हे कृत्य केल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

वाईट स्वप्न अन् भुताच्या भीतीने घेतला बळी

प्रभाकरन यांनी एक वाईट स्वप्न पाहिलं होतं. ज्यामध्ये आगीमध्ये जळालेली एक महिला त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला होता. आपल्या मित्रमंडळींना आणि कुटुंबीयांना त्यांनी या स्वप्नाविषयी माहिती दिली होती. त्यामुळेच त्याच्या मनात भुताची भीती होती. तो सतत घाबरलेला असायचा. प्रभाकरनची तब्येत गेल्या अनेक दिवसापासून खराब होती आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. 

पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

एकच स्वप्न पुन्हा पुन्हा पडत असल्याने प्रभाकरनने ज्योतिषांचीही मदत घेतली. बरे होण्यासाठी त्याने 15 दिवसांची सुट्टीही घेतली होती. याच दरम्यान, त्याची मुलं व पत्नी एका लग्न समारंभाला गेले असता त्यांने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. कुटुंबीय परत आले तेव्हा त्यांना प्रभाकरनचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून तपास सुरू आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस