शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:27 IST

राजा रघुवंशी घटनेमुळे लोकांच्या मनात भीती असतानाच, आता असेच एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एका आईने स्वतःच्या मुलीविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. 

मध्य प्रदेशातील इंदूर येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी याची त्याच्याच पत्नीने, सोनम रघुवंशी हिने प्रियकराच्या मदतीने हनिमूनवर असताना हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. इंदूरच्या या घटनेमुळे लोकांच्या मनात भीती असतानाच, उत्तर प्रदेशातील शामली येथून असेच एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एका आईने स्वतःच्या मुलीविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. 

आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तिची मुलगी आपल्या प्रियकराच्या मदतीने तिच्या पतीची म्हणजेच जावयाची हत्या करू शकते, अशी भीती तिला वाटत आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनाही या महिलेचे बोलणे ऐकून धक्का बसला. या महिलेने तक्रार दाखल करताना सांगितले की, तिच्या मुलीचे लग्न होऊन १२ वर्षे झाली आहेत, पण तिचे सासरच्या घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळले आहेत. तिच्या आईने पोलिसांना सांगितले की, "माझी मुलगी तिच्या प्रियकरासोबत मिळून माझ्या जावयाला राजा रघुवंशीसारखे मारून टाकेल."

मुलीच्या प्रेमसंबंधांची माहिती तिच्या सासरच्या लोकांना कळल्यावर, त्यांनी तिला माहेरी आणले. हे प्रकरण शामलीच्या चौसाना चौकी भागातील अलीपूर गावातून समोर आले आहे.

प्रियकरासोबत पळून गेली आणि सासरी गोंधळ घातला!आईने दिलेल्या माहितीनुसार, घरातून पळून गेल्यानंतर ही मुलगी बुधवारी तिच्या प्रियकरासोबत तिच्या सासरच्या घरी पोहोचली होती. त्यावेळी तिथे तिने घरात तोडफोड केली, आपल्या दीराला मारहाण केली आणि सासरच्या घरीच राहणार असे बोलू लागली. मात्र, जेव्हा तिच्या पतीने तिला घर सोडून जाण्यास सांगितले, तेव्हा तिने आणखी गोंधळ घातला. या परिस्थितीमुळे तिचा पती आणि आई यांनी तिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मुलगी जावयासाठी धोकादायक!आरोपी महिलेच्या पतीनेही आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तर, मुलीच्या आईने म्हटले की, "आमची मुलगी सोनम रघुवंशीपेक्षा कमी नाही. ती आमच्या जावयाला मारू शकते. ती तिच्या प्रियकरासोबत मिळून जावयाला मारण्याचा कट रचू शकते. आम्हाला याचीच भीती वाटत आहे."

या सर्व आरोपानंतर आईने आपल्या मुलीविरुद्ध चौसाणा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोन्ही पक्षांना जामिनावर स्वाक्षरी करायला लावली आहे आणि प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशhusband and wifeपती- जोडीदार