Crime News:घराकडे पाहण्याच्या कारणावरून एकाने कुऱ्हाडीने तोडला शेजाऱ्याचा दरवाजा
By अनिल गवई | Updated: September 20, 2022 14:29 IST2022-09-20T14:28:45+5:302022-09-20T14:29:15+5:30
Crime News: घराकडे पाहण्याच्या कारणावरून एकाने शेजा-यास अश्लिल शिविगाळ, लोटपाट करून जखमी केले. हातातील कु-हाडीने शेजा-याच्या लोखंडी दरवाजाची नासधूस केली.

Crime News:घराकडे पाहण्याच्या कारणावरून एकाने कुऱ्हाडीने तोडला शेजाऱ्याचा दरवाजा
- अनिल गवई
खामगाव - घराकडे पाहण्याच्या कारणावरून एकाने शेजा-यास अश्लिल शिविगाळ, लोटपाट करून जखमी केले. हातातील कु-हाडीने शेजा-याच्या लोखंडी दरवाजाची नासधूस केली. ही घटना खामगाव तालुक्यातील लासुरा जहाँगीर येथे सोमवारी सायंकाळी घडली.
खामगाव तालुक्यातील लासुरा जहॉगीर येथे भारत यादव आणि त्यांची पत्नी वनिता सोमवारी सायंकाळी घरी असताना, त्यांचा शेजारी असलेला ईश्वर बाबाराव तायडे हा यादव यांच्याघरी हातात कुºहाड घेऊन पोहोचला. घराकडे पाहण्याच्या कारणावरून त्याने भारत यादव यांच्याशी वाद घातला. अश्लिल शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचवेळी यादव यांच्या घराचा लोखंडी दरवाजा कुºहाडीने तोडून भारत यादव यांना लोटपाट करून जखमी केले. याप्रकरणी वनिता भारत यादव यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीसांनी भादंवि कलम ४५२, ४२७, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.