शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: शेजारचे दुकान भाड्याने घेतले, भिंतीला भगदाड पाडले अन् एक किलोहून अधिकचे दागिने लांबवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 23:58 IST

Crime News: वारजे येथे सराफ दुकानाच्या शेजारचे दुकान भाड्याने घेऊन दोन्ही दुकानाच्या मधील भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी सराफ दुकानातून लाखो रुपयांच्या दागिन्यांची लुट केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे -  वारजे येथे सराफ दुकानाच्या शेजारचे दुकान भाड्याने घेऊन दोन्ही दुकानाच्या मधील भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी सराफ दुकानातून लाखो रुपयांच्या दागिन्यांची लुट केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना वारजे इंडिया रोडवरील लक्ष्मी माथा येथील माऊली ज्वेलर्स या सराफ दुकानात शुक्रवारी दुपारी दोन ते पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. सुमारे एक किलो पेक्षा अधिक सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचा संशय आहे. दुकानातून किती किंमतीचा ऐवज चोरीला गेला याची माेजदाद उशिरापर्यंत सुरु होती.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी माऊली ज्वेलर्स यांच्या दुकानाशेजारील दुकान मसाल्याच्या व्यवसायासाठी भाड्याने घेतले होते. त्या दुकानात फर्निचरचे काम सुरु होते. नवी दुकान टाकायचे असल्यामुळे काम सुरु असल्याने चोरट्यांचा संशय आला नाही. शुक्रवारी दुपारी माऊली ज्वेलर्स हे दुकान बंद होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी काम सुरू असल्याचा बहाणा करून दोन दुकानाच्या मध्ये असलेल्या भिंतीला भलेमोठे भगदाड पाडले. तेथून आत प्रवेश करून सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला.

ज्वेलर्सचे मालक सायंकाळी दुकान उघडण्यासाठी परत आले तेव्हा त्यांना दुकानात चोरी झाल्याचे समजले. घटनेची माहिती मिळताच घटनेची माहिती मिळताच वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, गुन्हे शाखेची पथक व स्थानिक पोलिसांनी चोरी झालेल्या ठिकाणी भेट देऊन आरोपींचा शोध सुरु केला आहे. एक किलो पेक्षा अधिक किमतीचे दागिने दुकानातून चोरी केल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जातो आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGoldसोनं