शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विकृतीचा कळस! एकतर्फी प्रेमातून विवाहित महिलेवर अ‍ॅसिड हल्ला; पोलिसांवरही केला गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 12:45 IST

Crime News : अ‍ॅसिड हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नवी दिल्ली – देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान दिल्लीमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आली आहे. एकतर्फी प्रेमात माथेफीरू तरुणाने विवाहित महिलेवर अ‍ॅसिड हल्ला केल्याची घटना घडली आहे. भयंकर बाब म्हणजे आरोपीने पोलिसांवर देखील गोळीबार केला आहे. या अ‍ॅसिड हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी तरुणाने पीडित महिलेला भेटण्याच्या बहाण्याने आपल्या घरी बोलावले. महिला घरी येताच तिला दोरीने बांधले आणि तिच्यावर अ‍ॅसिड फेकले. दरम्यान घटनेनंतर आरोपीला बिहारच्या बक्सर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमधील बवाना परिसरातील ही घटना आहे. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. मोंटू असं आरोपीचं नाव असून हल्ल्यानंतर तो बिहारमध्ये पळून गेला होता. त्याला आता बक्सर जिल्ह्यामधून अटक करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस आल्याची माहिती मिळताच त्याने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. गोळीबारामध्ये आरोपी मोंटू हा जखमी झाला आहे. त्याला दिल्लीमध्ये आणण्यात आले असून त्याच्यावर देखील उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

'तिने' नकार दिला म्हणून 'तो' चि़डला

पीडित महिला ही विवाहित असून ती दिल्लीमध्ये तिच्या पतीसोबत राहात होती. तिचा पती एका स्थानिक कारखान्यामध्ये कामाला होता. मोंटू हा देखील पीडितेच्याच गावचा रहिवासी आहे. आरोपी या महिलेवर एकतर्फी प्रेम करत होता. पतीला सोडून तू माझ्यासोबत राहायला ये अशी मागणी आरोपी वारंवार या महिलेकडे करत होता. मात्र तसे करण्यास महिलेने नकार दिल्याने तो संतापला आणि तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात ही महिला गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस