शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

Crime News: शीर नसलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधांतून प्रियकराचे केले चार तुकडे; एसीपींचा चालकच निघाला मारेकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 10:19 AM

Crime News: पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधांतून सहायक पोलीस आयुक्तांच्या (एसीपी) चालकानेच पत्नीच्या प्रियकराची हत्या करत त्याचे चार तुकडे केल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली आहे.

मुंबई : पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधांतून सहायक पोलीस आयुक्तांच्या (एसीपी) चालकानेच पत्नीच्या प्रियकराची हत्या करत त्याचे चार तुकडे केल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने चालक पोलीस नाईक शिवशंकर गायकवाड (४५) याला पत्नी मोनालीसह अटक केली आहे. तर, मुंडके अद्याप सापडले नसून त्याचाही तपास सुरू आहे.

सायन विभागाच्या एसीपींच्या कार्यालयाबाहेर ३० सप्टेंबर रोजी जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांसह गुन्हे शाखेच्या कक्ष ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंद्रजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली याचा समांतर तपास सुरू केला. मुंडके नसल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवून आरोपीपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. सुरुवातीला मृतदेहाच्या हातावरील टँटूवरून पथकाने तपास सुरू केला.पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. परिसरातील मोबाइल टाॅवर लोकेशनच्या मदतीने दादा नावाच्या व्यक्तीचे लोकेशन तेथे आढळून आले, पोलिसांनी नंबर ट्रेस केला असता, तो सोलापूरचा असल्याचे समोर आले. पोलीस चौकशीत दादाही गायब असल्याचे समोर येताच तोच धागा पकडून तपास सुरू झाला. दादाच्या मोबाइलच्या काॅल रेकॉर्डमध्ये शिवशंकर आणि मोनाली संपर्कात असल्याचे समोर येताच, त्यांना ताब्यात घेत चौकशी करताच त्याने गुह्याची कबुली दिली.वरळी पोलीस वसाहतीत राहणाऱ्या शिवशंकर याचे पत्नी मोनाली हिच्यासोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून वारंवार भांडण व्हायचे. शिवशंकरच्या त्रासाला कंटाळून पत्नी अक्कलकोटला निघून गेली. तेथेच तिची जगदाळेसोबत ओळख झाली. पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ते दोघे सोबत राहू लागले. त्यानंतर घर सोडून गेलेली पत्नी नुकतीच घरी आली होती. दोघांमध्ये चांगले सुरू असताना त्याला जगदाळेबाबत समजताच त्याचा संशय खरा ठरला. यातून दोघांमध्ये टोकाचे भांडण झाले. त्यावेळी शिवशंकर स्वत:वर चाकूहल्ला करून घेत असताना मोनालीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या हातावरही चाकूचे वार झाले.त्यानंतर शिवशंकरने जगदाळेचा काटा काढण्याचा कट रचला. दादा जगदाळे हा ओळखीचा असल्याने शिवशंकरने त्याला गोड बोलून मुंबईला आणले. मुंबईत त्याची निर्घृण हत्या केली. शिवशंकरने प्रियकराची हत्या केल्याचे समजताच तिलाही धक्का बसला. हे प्रकरण घरापर्यंत येऊ नये, यासाठी तिनेही मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शिवशंकरला मदत केली. दोघांनी जगदाळे याचा मृतदेह २९ सप्टेंबरच्या रात्री सायनच्या एसीपी कार्यालयाबाहेर टाकला. पुरावे नष्ट करण्यासाठी तो जाळण्याचाही प्रयत्न केला. कुणालाही संशय येऊ नये, म्हणून शिवशंकर नियमित कामावर हजर झाला होता. दोघांनाही १४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शीर फेकले कचऱ्यात- आरोपीने दादा जगदाळे याचे मुंडके कचऱ्यात फेकल्याची माहिती गुन्हे शाखेला दिली आहे. सध्या पथक याच मुंडक्याचा शोध घेत आहेत.- या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांपुढे मुंडक्याचे शोध घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई