मुंबई : बोलण्यात गुंतवून म्यानमारच्या व्यापाऱ्याच्या ५ कोटी किमतीच्या माणिक स्टोनवर डल्ला मारलेल्या चौकडीला अवघ्या बारा तासांच्या आत अटक करण्यास पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून माणिक स्टोनही जप्त करण्यात आले आहे.म्यानमारचे नागरिक ये मिन एम एच अली मोहम्मद दादाभाई (५८) हे हिरे व किमती स्टोनचा व्यापार करतात. व्यापारानिमित्ताने मुंबईत आले होते. त्यांची उदय चौकसीसोबत ओळख झाली. चौकसीचा हिरे खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. याचदरम्यान तक्रारदार यांच्याकडे पाच कोटी रुपये किमतीचे दोन माणिक स्टोन असल्याची माहिती चौकसीला मिळाली. त्यानुसार, सुरेशभाई बोराड, खेताराम देवासी, विंकल शाह, प्रवीण ऊर्फ पप्पू जैन यांच्यासह मिळून त्यांना ऑपेरा हाउस येथे बोलावले. बोलण्यात गुंतवून माणिक पळवले होते. पोलिसांनी चौकडीला ताब्यात घेतले.
Crime News: मुंबई पोलिसांनी परत मिळवले ५ कोटींचे माणिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 07:37 IST