शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
3
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
4
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
5
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
6
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
7
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
8
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
9
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
10
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
11
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
12
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
13
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
14
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
15
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
16
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
17
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
18
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
19
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
20
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण

बापरे! तरुणाने गर्लफ्रेंडच्या घराबाहेरच केली आत्महत्या; लव्ह स्टोरीचा 'असा' झाला भयंकर शेवट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 17:10 IST

Crime News : प्रेम प्रकरणात अपयशी ठरलेल्या एका प्रियकराने टोकाचं पाऊल उचलल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये (Meerut) प्रेम प्रकरणात अपयशी ठरलेल्या एका प्रियकराने टोकाचं पाऊल उचलल्याची भयंकर घटना समोर आली आहे. आपल्या प्रेयसीच्या घरासमोर जाऊन स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केली आहे. मेरठच्या पोलीस ठाणे हद्दतील शाहपीर गेटच्या बाहेर शुक्रवारी सकाळी तरुणाचा मृतदेह सापडल्यानंतर गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. 

प्रेमप्रकरणाशी संबंधित हे प्रकरण असल्याचं समोर आलं. पोलिसांनी या प्रकरणात प्रत्येक अँगलने तपास सुरू केला आहे. मृत तरुणाचे नाव नाजिम (26 वर्षे) असल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी जेव्हा नाजिमचे कॉल डिटेल्स तपासले तर सकाळी 3.10 वाजता त्याने आपल्या प्रेयसीला कॉल केला होता. त्यावेळी दोघांमध्ये काहीतरी बोलणं झालं. यानंतर नाराज नाजिमने स्वत:चाच जीव घेतला.

सकाळी प्रेयसीच्या घराबाहेर मृतदेह पाहून परिसरात एकच गोंधळ उडाला. तातडीने पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. नाजिमच्या कुटुंबीयांनी त्याच्या मृतदेहाची ओळख पटवली. मृत तरुणाजवळ एक मोबाईल सापडला, त्याचा तपास केल्यानंतर नेमका प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

नाजिमच्या ओळखीच्यांकडून कळालं की, गेल्या अनेक दिवसांपासून शाह पीर गेट येथे राहणाऱ्या एका तरुणीशी तो बोलत होता. दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. ज्यानंतर सातत्याने नाजिम त्या मुलीला फोन करीत होता. गेल्या रात्री दोघांमध्ये काहीतरी बोलणं झालं, यानंतर नाजिमने स्वत:ला गोळी मारली. नाजिमच्या घरात शोककळा पसरली आहे. तर पोलीस या प्रकरणात सुसाइड व्यतिरिक्त इतर हत्याच्या अँगलचा तपास करीत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी