शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

नात्याला काळीमा! डोळ्यासमोर तडफडत होती सख्खी बहीण अन् 'तिला' पाहून हसत होता खुनी भाऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 15:31 IST

Crime News : एका भावानेच आपल्या बहिणीच्या डोक्यात गोळी झाडत तिची हत्या केली.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) भयंकर घटना समोर आली आहे. एका भावानेच आपल्या बहिणीच्या डोक्यात गोळी झाडत तिची हत्या केली. आपल्या बहिणीच्या प्रेमप्रकरणाबद्दल भावाला माहीत झालं होतं. त्यामुळेच बदनामीच्या भीतीने त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. गोळी मारल्यानंतर मरणाच्या आधी बहीण तडफडत होती. मात्र भाऊ तिथेच उभा राहून हसत राहिला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मेरठच्या सरधना येथील आहे. रात्री उशिरा घरात सर्व झोपलेले असताना आरोपी आरिफने हे धक्कादायक कृत्य केलं आहे. याआधीही आपल्या बहिणीला मारण्याचा प्रयत्न केला असल्याचं आरोपीने म्हटलं आहे. जेव्हा मुलगी मरणाच्या दारात होती आणि तडफडत होती, तेव्हा आरोपी तिला म्हणत होता की मी तुला किती वेळा समजावलं. मात्र, तू आमचं ऐकलं नाहीस आणि आमची बदनामी करत राहिली. आरोपीने आमच्या कुटुंबाची तिच्यामुळे भरपूर बदनामी होत होती असं देखील म्हटलं आहे. 

बहिणीच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळताच भावाने उचललं टोकाचं पाऊल

मेरठच्या सरधना ठाण्याच्या क्षेत्रातील मोहल्ला इस्लामाबादमध्ये आपल्या मामाकडे राहणाऱ्या सिमरनचं आपल्याच शेजारी राहणाऱ्या एका तरुणासोबत अफेअर होतं. या मुलीला आपल्या प्रियकरासोबत लग्न करायचं होतं. मात्र कुटुंबीयांचा याला विरोध होता. जेव्हा कुटुंबीयांना याबाबत माहिती झाली तेव्हा त्यांनी मुलीवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आणि तिचं घरातून बाहेर जाणं बंद केलं. मात्र तरीही ही मुलगी मोबाईलवरुन आपल्या प्रियकरासोबत बोलत असे. हत्येच्या 3 दिवस आधी तिच्या लहान भावानं तिला प्रियकरासोबत पाहिलं होतं. यानंतर त्याला प्रचंड राग आला आणि त्यानं आपल्या बहिणीला मारण्याचा प्लॅन केला.

मुलीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून सर्वच हैराण

आरोपीनं जेव्हा बहिणीची हत्या केली तेव्हा ती झोपलेली होती. गोळीचा आवाज आणि सिमरन ओरडल्याने घरातील सर्व जण जागे झाले. टेबलवर आपल्या मुलीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून सर्वच हैराण झाले. आरिफ शेजारीच उभा होता, त्याच्या हातात बंदुक होती अन् तो हसत हसत तिथेच उभा होता. घटनेची माहिती मिळताच रात्री दीड वाजता पोलीस याठिकाणी पोहोचले आणि मुलीला रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी बहिणीच्या हत्येप्रकरणी आरिफला अटक केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस