शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! पत्नीच्या प्रियकराला मारण्यासाठी तांत्रिकाकडे गेलेल्या पतीचीच झाली हत्या; असा झाला उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 10:56 IST

Crime News : पत्नीच्या प्रियकराला मारण्यासाठी तांत्रिकाकडे गेलेल्या पतीचीच हत्या झाली आहे. एका पतीला आपल्या पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत असल्याचा संशय होता.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूरमध्ये एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पत्नीच्या प्रियकराला मारण्यासाठी तांत्रिकाकडे गेलेल्या पतीचीच हत्या झाली आहे. एका पतीला आपल्या पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत असल्याचा संशय होता. यामुळे त्याने तांत्रिकांची मदत घेतली. जेणेकरून पत्नीच्या प्रियकराला आपला रस्त्यातून बाजूला करता येईल. मात्र, तांत्रिकाच्या नादात पतीचीच हत्या झाली. मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिकाकडे येत असतानाच याच काळात नीरज दीक्षित याची भेट शैलेंद्र नावाच्या एका व्यक्तीसोबत झाली.

शैलेंद्र आपल्या भावासाठी तांत्रिकाकडे येत असे. काहीच दिवसांत शैलेंद्र आणि नीरज यांची मैत्री झाली. यादरम्यान शैलेंद्रने नीरजकडून 75 हजार रुपये घेतले आणि तांत्रिक पूजा करून त्याच्या पत्नीच्या प्रियकराची हत्या करेल असं म्हटलं. मात्र, काही दिवसांनी नीरजने शैलेंद्रला म्हटलं की अजूनही काहीच झालेलं नाही आणि दोघांमध्ये भांडण सुरू झालं. यानंतर शैलेंद्रने नीरजला म्हटलं, की तुला हमीपुरच्या मोठ्या तांत्रिकाला भेटवतो. नीरजही तयार झाला आणि त्याच्यासोबत गेला. मात्र, यादरम्यान शैलेंद्रनं आपले मित्र धर्मेंद्र आणि शामू यांच्या मदतीनं नीरजची हत्या केली. 

सध्या पोलिसांनी शैलेंद्र आणि धर्मेंद्र या दोन आरोपींना अटक केली आहे. शामू अजूनही फरार आहे. 13 ऑगस्टला फजलगंज येथून बेपत्ता झालेल्या नीरजचा मृतदेह 17 ऑगस्टला हमीरपुरच्या जंगलात आढळला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी घटना लपवण्यासाठी तीन जिल्ह्यांचा उपयोग केला आणि घटनेला नवं वळण देण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी कानपूरच्या फजलगंज येथून तांत्रिकाला भेटवण्याच्या बहाण्यानं नीरजला आपल्यासोबत नेलं. यानंतर हमीरपुरमध्ये त्याची हत्या केली. हत्येनंतर त्याची गाडी फतेहपूर जिल्ह्यात आणून जाळली. मात्र, कॉल डिटेलमुळे या सर्वांची पोलखोल झाली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

विकृतीचा कळस! लग्नानंतर मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या विवाहितेवर पुजाऱ्याचा बलात्कार; घटनेने खळबळ

राजस्थानच्या जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या विवाहितेवर पुजाऱ्याने बलात्कार केल्याची भयंकर घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जयपूरमधील चंदवाजी पोलिसांनी याप्रकरणी मंदिरातील पुजाऱ्याला 15 तासांत अटक केली आहे. जयपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शंकर दत्त शर्मा दिलेल्या माहितीनुसार, 18 ऑगस्ट रोजी 23 वर्षीय विवाहितेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, गावातील मंदिराचे पुजारी गोपाळ उर्फ मुकेश जांगिड यांनी बलात्कार केला असं म्हटलं आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndiaभारतPoliceपोलिस