भयावह! 'ती' ओरडत होती तरी 'तो' कुऱ्हाडीने वार करत होता...; पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 12:27 PM2022-05-11T12:27:14+5:302022-05-11T12:32:36+5:30

Crime News : पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल आहे. तिने केलेलं जेवण आवडलं नाही म्हणून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे.

Crime News man tried to kill his wife by beating with axe in mohanlalganj lucknow police arrested accused | भयावह! 'ती' ओरडत होती तरी 'तो' कुऱ्हाडीने वार करत होता...; पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला

भयावह! 'ती' ओरडत होती तरी 'तो' कुऱ्हाडीने वार करत होता...; पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला

googlenewsNext

नवी दिल्ली - पती-पत्नीमध्ये नेहमीच छोट्या-मोठ्या गोष्टींवरून वाद होत असतात. काही वाद हे विकोपाला देखील जातात अशीच एक घटना आता समोर आली आहे. जेवणावरून सुरू झालेला वाद टोकाला गेला आणि पतीने पत्नीवर थेट जीवघेणा हल्ला केल्य़ाची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल आहे. तिने केलेलं जेवण आवडलं नाही म्हणून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती सध्या चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर आरोपी पतीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुभाष चंद्र गौतम असं आरोपीचं नाव आहे. घटनेच्या दिवशी तो रात्री उशीरा आपल्या घरी आला. त्यावेळी त्याला पत्नी लक्ष्मीने आवडतं जेवण न बनवल्याचं कळालं. 

जेवणावरून त्याने वाद घालायला सुरुवात केली. पुढे तो वाद टोकाला गेला आणि रागाच्या भरात सुभाषने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करायला सुरुवात केली. ती जोरजोराने ओरडत होती पण तो वार करत होता. महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी घरात आले. त्यावेळी पती फरार झाला. शेजाऱ्यांनी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आणि पोलिसांना माहिती दिली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
 

Web Title: Crime News man tried to kill his wife by beating with axe in mohanlalganj lucknow police arrested accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.