शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: जम्मू काश्मीरमधून पळून आलेले प्रेमी युगुल पालघरमध्ये सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 23:55 IST

प्रेम प्रकरणातून जम्मू काश्मीर मधून पळून आलेल्या आणि पालघर मध्ये वास्तव्यास असलेल्या प्रेमी युगुलाचा शोध घेण्यास पालघर-काश्मीर पोलिसांच्या टीम ला यश आले.

पालघर - प्रेम प्रकरणातून जम्मू काश्मीर मधून पळून आलेल्या आणि पालघर मध्ये वास्तव्यास असलेल्या प्रेमी युगुलाचा शोध घेण्यास पालघर-काश्मीर पोलिसांच्या टीम ला यश आले.अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी जुल्फिकार मोहमद सादिक खटाना(वय २२वर्ष) ह्याला काश्मीर पोलिसांनी ताब्यात घेतले.

जम्मू-काश्मिर च्या राजौरी पोलीस ठाण्यातर्गत असलेल्या एका गावात राहणाऱ्या आरोपी तरुण जुल्फिकार ह्याचे आपल्या जवळच राहत असलेल्या अल्पवयीन प्रेयसी सोबत प्रेमसंबंध जुळले.ह्या प्रेम संबंधाला विरोध होऊ लागल्या नंतर प्रेमात आकंठ बुडालेल्या ह्या युगुलानी जम्मू-काश्मीर मधून पळ काढला.ह्या प्रकरणी ५ मार्च रोजी  राजौरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला.राजौरी पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल चे लोकेशन ट्रेस केल्यावर ते विविध भागात आढळून येत होते.पोलिसांनी ह्याचा तपास सुरूच ठेवल्या नंतर आरोपीने आपला मोबाईल स्विच ऑफ करून ठेवल्याने अनेक दिवस त्याचा शोधच लागत न्हवता.मात्र काही दिवसानंतर आरोपी तरुणाने आपला बंद ठेवलेला मोबाईल सुरू केल्यावर त्यावर तरुणांचे लोकेशन जोगेश्वरी,मुंबई आढळून आले.

पोलिसांनी अधिक शोध घेतला असता जुल्फिकार ह्याच्या ओळखीच्या व्यक्तीकडे जोगेश्वरी मध्ये राहत असल्याचे कळल्यावर राजौरी पोलिसांनी जुल्फिकार ह्यांच्याशी संपर्क साधत कुठेही जाऊ नकोस आम्ही आपणास न्यायला येतो असे कळवले.आपणास पोलीस पकडतील ह्या भीतीने त्या प्रेमी युगुलाने जोगेश्वरी मधून पळ काढला.त्यांनी लोकल पकडून सरळ पालघर गाठीत नवलीच्या विष्णू नगर मधील एक रूम भाड्याने घेतली.मागील ८-१० दिवस ते पालघर मध्ये राहिल्या नंतर पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रमेश पालवे आणि महिला पोलिस कदम ह्यांच्या मदतीने राजौरी पोलिसांनी ह्या युगुलाला ताब्यात घेतले.एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्या प्रकरणी राजौरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून शुक्रवार ह्या दोघांना घेऊन राजौरी पोलीस जम्मू-काशीर कडे रवाना झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpalgharपालघरJammu Kashmirजम्मू-काश्मीर