शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अजब प्रेमाची गजब गोष्ट! प्रेमात वेडावलेल्या तरुणाने प्रेयसीचे नाक, कान कापले; अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 15:16 IST

Crime News : प्रेमात एका माथेफिरू प्रियकराने आपल्या प्रेयसीचं नाक आणि कान कापल्याची भयंकर घटना घडली आहे.

नवी दिल्ली - प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. कुटुंबीयांनी विरोध केला तर घर सोडून पळून जाऊन लग्न करतात. तर काही वेळा आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. बिहारमध्ये एका अजब प्रेमाची गजब गोष्ट आता समोर आली आहे. प्रेमात एका माथेफिरू प्रियकराने आपल्या प्रेयसीचं नाक आणि कान कापल्याची भयंकर घटना घडली आहे. कटिहार जिल्ह्यातील बरारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, कटिहारमध्ये राहणारी एक महिला रविवारी छठ पुजेच्या निमित्ताने गंगा स्नान करण्यासाठी गेली होती. या दरम्यान पौर्णिया नगर पोलीस ठाणे हद्दीतील गणेशपूर येथील राहणारा प्रीतम कुमार तेथे पोहोचला आणि महिलेसोबत चुकीचे वर्तन करू लागला. यानंतर त्याने महिलेला मारहाण केली आणि तिचं नाक आणि कान कापलं. यानंतर तरुणाने आपण केलेल्या कृत्याबद्दल पश्चाताप व्यक्त केला. प्रीतमने रडत रडत सांगितलं की, तो आपल्या प्रेयसीला देवी मानतो. मात्र ही चूक कशी झाली हे माहीत नाही.

प्रीतम पुढे म्हणाला की, त्याला काहीच सांगायचं नाही. त्याला आपल्या प्रेयसीची बदनामी करायची नाही. तर दुसरीकडे पीडितेने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने पैसे घेतले होते आणि ते त्याला परत करायचे नव्हते. तो नेहमी पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देत असतो. रविवारी तो आला आणि मारहाण करू लागला. याच दरम्यान तेथे असलेल्या लोकांनी महिलेला वाचवल्याचं तिने म्हटलं आहे. 

रुग्णालयाचे डॉक्टर उदयन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी साधारण 1.30 वाजता महिला आणि तरुणाला रुग्णालयात आणलं होतं. दोघेही जखमी झाले होते. महिलेचं नाक आणि कान कापलं होतं. पोलिसांनी पीडितेच्या प्राथमिक तक्रारीनंतर तरुणाला अटक केली आहे. सध्या महिलेवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात महिलेने प्रेम संबंधाबद्दल काहीच माहिती दिलेली नाही. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस