शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

बाबो! पहिल्या पतीला सोडून दुसरं लग्न केलं; फेसबुकवर तिसऱ्यावरच प्रेम जडलं अन् भलतंच घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 18:36 IST

Crime News : फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या प्रेमाचा भयावह अंत झाला. ही महिला आपल्या प्रियकरासाठी छत्तीसगडहून स्कूटीवरुन मध्य प्रदेशातील सतला जिल्ह्यात आली होती. 

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक महिला पहिल्या पतीला सोडून दुसऱ्या तरुणासोबत लग्न करते. मात्र यानंतरही ती फेसबुकवर तिसऱ्याच एका तरुणाच्या प्रेमात पडल्याची घटना समोर आली आहे. भयंकर बाब म्हणजे फेसबुकवरच्या तिच्या प्रेमाने अखेर तिचाच घात केला. त्याने तिला विष दिलं आणि ती बेशुद्ध अवस्थेत असताना तिची गळा दाबून तिची हत्या केली आहे. सतना पोलिसांनी या हत्याकांडाचा खुलासा केला आहे. फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या प्रेमाचा भयावह अंत झाला. ही महिला आपल्या प्रियकरासाठी छत्तीसगडहून स्कूटीवरुन मध्य प्रदेशातील सतला जिल्ह्यात आली होती. 

प्रियकराने आपल्या मित्रांसह मिळून तिला आधी विष दिलं आणि त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केली. यानंतर तिला जवळील जंगलात फेकून दिलं. 27 डिसेंबर रोजी मिळालेल्या या मृतदेहानंतर तपास सुरू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी नंदू उर्फ नंदकिशोर यादव आणि अर्जुन पटेल याला अटक केली आहे. दोघेही उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील राहणारे आहेत. त्यांच्याकडे निळ्या रंगाची एक्टिवा स्कूटी आणि मृत महिलेचा मोबाईल सापडला आहे. घटनास्थळी मिळालेल्या बॅगेतून छत्तीसगडचा पत्ता सापडला. 

फेसबुकवरच्या प्रेमाने केला 'तिचा' घात

30 डिसेंबर रोजी मोबाईल नंबरवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. महिलेचा दीर असल्याचं सांगण्यात आलं. ही महिला 22 डिसेंबरपासून स्कूटी घेऊन बेपत्ता आहे. पोलिसांनी मृत महिलेच्या मोबाईलमधून कॉल डिटेल्स बाहेर काढले आणि आरोपीसोबत जवळीक असल्याचं समोर आलं. या प्रकरणात पोलिसांनी नंदू आणि अर्जुन यांना ताब्यात घेतलं आहे. कसून चौकशी केल्यावर दोघांनी आपला गुन्हा कबूल केला आणि महिला लग्न, एकत्र राहण्यासाठी जबरदस्ती करीत असल्याचं सांगितलं. यामुळे दोघांनी आधी महिलेला विष दिलं, त्यानंतर तिचा गळा आवळून हत्या केली. यानंतर आरोपी नंदू महिलेची स्कूटी आणि मोबाईल घेऊन फरार झाला.

'असा' झाला लव्हस्टोरीचा भयानक अंत

आरोपी नंदूने महिलेला आपल्या रस्त्यातून हटवण्यासाठी मित्र अर्जून याच्यासोबत मिळून 24 डिसेंबर रोजी हत्या केली. नंदूने आधी महिलेच्या जेवणात विष दिलं, मात्र विषामुळे तिचा मृत्यू झाला नसल्यानं त्याने महिलेचा गळा आवळला. विवाहित असतानाही प्रियकरासोबत लग्न आणि एकत्र राहण्याच्या हट्टापायी हत्या केल्याचं आरोपीने सांगितले. महिलेचं पहिलं लग्न संजय शाहसोबत झालं होतं. यादरम्यान बांदा येथील नंदूसोबत ऑनलाईन भेट झाली. फेसबुकवर दोघांचंही प्रेम प्रकरण सुरू झालं. ते एकमेकांसोबत मोबाईलवर बोलत होते. फेसबुकवर दोघांचं प्रेमप्रकरण सुरू झालं होतं. यानंतर नंदू अनेकदा तिला भेटायला छत्तीसगड देखील गेला होता. नंदूदेखील विवाहित आहे. महिलेने हट्ट केल्यानंतर त्याने तिची हत्या केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :FacebookफेसबुकCrime Newsगुन्हेगारी