शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
2
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
3
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
4
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
5
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य
6
शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?
7
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
8
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
9
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
10
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
11
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
12
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
13
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
14
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
15
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
16
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
17
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
18
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
19
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
20
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत

बापरे! अंत्यसंस्कार सुरू असतानाच पोलीस आले अन् चितेवरून मृतदेहच घेऊन गेले; 'हे' आहे नेमकं कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 17:52 IST

Crime News : कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कार सुरू करण्यात आले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना पुन्हा एकदा हरियाणात घडली आहे. गावातील एका महिलेची हत्या करण्यात आली होती. मात्र पोलिसांना याबाबत सुचना न देताच कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कार सुरू करण्यात आले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच चिता विझवून मृतदेह तपासणीसाठी ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. एका महिलेची हत्या झाल्यावर पुरावे मिटवण्यासाठी तिच्यावर घाईघाईत अंत्यसंस्कार उरकले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील माजरा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. सासरच्या मंडळींनी सुनेला मारहाण करून तिची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पुरावे मिटवण्यासाठी सूनेवर घाईघाईनं अंत्यसंस्कार होत असल्याचं समजताच पोलीस अग्निशमन दलाचा बंब घेऊनच घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी स्मशानात पोहोचून अंत्यसंस्कार थांबवण्याची सूचना केली. मात्र तोपर्यंत चितेला अग्नी देण्यात आला होता आणि लाकडांनी पेट घेतला होता. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने तातडीने ही चिता विझवली आणि मृतदेह ताब्यात घेतला. 

सध्या सरकारी रुग्णालयाच्या शवागारात हा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह ठेवण्यात आला असून याबाबत अधिक तपशील द्यायला पोलिसांनी नकार दिला आहे. शवविच्छेदन अहवालातूनच याबाबत काही अधिक माहिती मिळू शकेल असं पोलिसांनी म्हटलं आहे. स्मशानभूमीत पोहोचण्यापूर्वी पोलिसांनी फॉरेन्सिक एक्सपर्ट टीमलाही घटनास्थळी बोलावलं होतं. मृतदेहाची तपासणी करून काही महत्वपूर्ण पुरावे आणि धागेदोरे मिळतात का याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. सासरच्या मंडळींची ही चौकशी करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

तुफान राडा! छोट्यांच्या भांडणावरून मोठ्यांमध्ये जोरदार हाणामारी; तलवारीने केला प्राणघातक हल्ला

छोट्या मुलांवरून पालकांमध्ये देखील मोठी भांडणं होतात. अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. छोट्यांच्या भांडणावरून मोठ्यांमध्ये रक्तपात झाला आहे. मुलांच्या दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण आणि हाणामारी झाली. याबाबत समजल्यानंतर दोन्ही मुलांचे पालक आक्रमक होत एकमेकांसमोर आले आणि त्यांच्यात हाणामारी झाली. पालकांमध्ये झालेल्या हाणामारीत एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला तलवार लागली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. भोपाळमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

टॅग्स :IndiaभारतCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस