शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सख्खा भाऊच झाला वैरी! कुऱ्हाडीने वार करून केली वहिनीसह भावाची हत्या; कारण ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 18:14 IST

Crime News : पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली असून याचा अधिक तपास करण्यात येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

नवी दिल्ली - छत्तीसगडच्या (Chhattisgarh) जशपूर (Jashpur) मध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. सख्खा भाऊच पक्का वैरी झाल्याचं समोर आलं आहे. एका व्यक्तीने जादू-टोण्याच्या संशयातून आपला भाऊ आणि वहिनीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे.  यामध्ये त्या व्यक्तीच्या पत्नीने देखील साथ दिली. याप्रकरणी पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली असून याचा अधिक तपास करण्यात येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री एक महिला अचानक पोलीस ठाण्यात आली आणि तिने आपल्या पतीसह दोन जणांची हत्या केल्याचं म्हटलं आहे. तसेच घराजवळ मृतदेह ठेवल्याचं देखील पोलिसांना सांगितलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मधनु राम आणि गंगोत्री अशी हत्या झालेल्या लोकांची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधमन भगत आपली पत्नी लुंदरी बाईसोबत डोभ येथे राहतो. त्याच्या शेजारीच त्याचा भाऊ मधनु राम ही राहतो. 

कुऱ्हाडीने वार केल्यामुळे पती-पत्नीचा जागीच मृत्यू

शुक्रवारी रात्री बुधमन आपल्या भावाच्या घरी अचानक आला आणि काहीही न बोलता कुऱ्हाडीने त्यांची निर्घृण हत्या केली. याच दरम्यान हा प्रकार त्याच्या वहिनीने पाहिला आणि ती आरडाओरडा करत घराबाहेर आली. त्यावेळी आरोपीने तिलाही पकडलं आणि तिची देखील हत्या केली. कुऱ्हाडीने वार केल्यामुळे पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, भाऊ आणि वहिनी हे जादूटोणा करायचे. त्याच्यामुळे आमच्या कुटुंबाला धोका होता म्हणून हत्या केली. 

दोन्ही कुटुंबामध्ये होता वाद

पोलिसांनी घर सील केलं असून दोन्हीही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गावकऱ्यांकडे देखील चौकशी केली. तेव्हा या दोन्ही कुटुंबामध्ये वाद असल्याचं समोर आलं आहे. हे दोघे जादूटोण्याचं काम करत असायचे. काही दिवसांपूर्वी आरोपीच्या मुलाचा अचानक मृत्यू झाला. त्यावेळी भाऊ आणि वहिनीनेच केलेल्या जादूटोण्याने मृत्यू झाल्याचा आरोपीला संशय होता. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस