शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नात्याला काळीमा! पती झाला हैवान, देहविक्रीसाठी टाकला दबाव; नकार दिल्याने पत्नीचं केलं मुंडण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 09:27 IST

Crime News : पत्नीला मारहाण करून आणि जीवे मारण्याची धमकी देऊन देहविक्री करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला.

नवी दिल्ली - महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पतीने आपल्या पत्नीवर देहविक्रीसाठी दबाव आणल्याची भयंकर घटना आता समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिने नकार दिल्यावर पतीने तिला बेदम मारहाण करत तिचं मुंडण केलं आहे. झारखंडच्या जामतारामध्ये ही संतापजनक घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पत्नीला मारहाण करून आणि जीवे मारण्याची धमकी देऊन देहविक्री करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. मात्र अखेर पत्नीने पोलिसांत धाव घेत याबाबत तक्रार केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यातील देवदाडमध्ये राहणाऱ्या आठवीतील मुलीचं तिच्या शेजारी राहणाऱ्या मुस्तकीम अन्सारीवर प्रेम जडलं होतं. शाळेत येता जाता ते एकमेकांना रोज पाहायचे. यातूनच पुढे त्यांचं प्रेमप्रकरण सुरू झालं. यानंतर याच वर्षी जानेवारीमध्ये मुलीने डायव्हर असलेल्या मुस्तकीम सोबत मुस्लीम रितीरिवाजाप्रमाणे निकाह केला. निकाहानंतर ती जेव्हा सासरी आली तेव्हा तिला मुस्तकीमचा पहिला निकाह झाल्याची माहिती समजली आणि मोठा धक्काच बसला.

मुस्तकीमला पहिली पत्नी आणि सात मुलं

मुस्तकीमला पहिली पत्नी आणि सात मुलं होती. निकाहा आधी त्याने ही माहिती लपवून ठेवली होती. ही बाब लक्षात आल्यामुळे धक्का बसलेल्या मुलीने सासर सोडून पुन्हा माहेरी येण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. जवळपास सात महिने ती माहेरी राहिली. मात्र मुस्तकीमने तिला समजावून पुन्हा घरी नेलं. सासरी गेल्यानंतर मात्र मुस्तकीमनं आपल्या दुसऱ्या पत्नीवर अऩ्याय करायला सुरुवात केली. तिने देहविक्री करण्यासाठी तयार व्हावं आणि त्याचे पैसे आपल्याला द्यावेत, अशी जबरदस्ती करायला त्याने सुरुवात केली. मुस्तकीम आणि त्याची पहिली पत्नी हे दोघं मिळून तिला मारहाण करू लागले. 

बेदम मारहाण करून केलं मुंडण 

मुलीला अनेकदा शॉकदेखील देण्यात आला. ती देहविक्रीसाठी तयार झाली नाही म्हणून रेल्वे ट्रॅकवर टाकून तिचा जीव घेण्याची धमकीदेखील दिली. तिला बेदम मारहाण केली आणि तिचं मुंडण केलं. रोजच्या अन्यायाला कंटाळलेल्या मुलीने अखेर पोलिसांत धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून दोषींवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणी पोलीस काही लोकांची चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस