Crime News Jalgaon: 'बड्डे बॉय'ला बेड्या! तलवार नाचवत मित्रांच्या खांद्यावर डोलला, त्यानेच केक कापला, अडचणीत आला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 10:54 AM2022-01-26T10:54:35+5:302022-01-26T10:54:47+5:30

गुन्हेगारीचं उदात्तीकरण; स्वतःच्या वाढदिवसाला मित्रांच्या खांद्यावर बसून नाचताना तलवार मिरवणे बड्डे बॉयला भोवलं

Crime News Jalgaon: cut the cake with Sword, Birth Day Boy Pankaj Chaudhari arrested | Crime News Jalgaon: 'बड्डे बॉय'ला बेड्या! तलवार नाचवत मित्रांच्या खांद्यावर डोलला, त्यानेच केक कापला, अडचणीत आला

Crime News Jalgaon: 'बड्डे बॉय'ला बेड्या! तलवार नाचवत मित्रांच्या खांद्यावर डोलला, त्यानेच केक कापला, अडचणीत आला

Next

सध्या वाढदिवस साजरे करण्याची भाईगिरीची पद्धत तरुणाईमध्ये रुजू लागली आहे. पोलीस कारवाई करत असले तरी देखील कुठे ना कुठे तरुण हातात तलवारी घेऊन, पिस्तूल, बंदुक घेऊन केक कापताना, मिरवणूक काढत आहेत. असाच प्रकार जळगाव शहरात घडला आहे. स्वतःच्या वाढदिवसाला मित्रांच्या खांद्यावर बसून नाचताना तलवार मिरवणे बड्डे बॉयला भोवलं आहे. 

पंकज भानुदास चौधरी असं अटक केलेल्या 'बड्डेबॉय'चे नाव आहे. २४ जानेवारी रोजी चौगुले प्लॉट भागात पंकजचा वाढदिवस साजरा झाला. मित्रांनी डीजेच्या तालावर नृत्य करीत पंकजला खांद्यावर घेतले, नाचताना पंकजच्या हातात तळपती तलवार दिली. बड्डेबॉयने आवेशात तलवार हवेत नाचवत नाच सुरू ठेवला, यानंतर त्याच तलवारीने पंकजने केक कापला. हा सर्व प्रकार वाढदिवसावेळी हजर असलेल्या तरुणांनी मोबाइलच्या कॅमेऱ्यात चित्रित केला होता. 

या हौशी तरुणांनी हा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला, हा व्हिडीओ काही वेळातच व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी पंकज चौधरीला अटक केली. शनिपेठ पोलीस ठाण्यात पंकजवर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Crime News Jalgaon: cut the cake with Sword, Birth Day Boy Pankaj Chaudhari arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.