शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

घरात टाइल्स बसवूनही मजुरी दिली नाही, बदला घेण्यासाठी कारागिरानं लावली मर्सिडीजला आग अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 12:31 IST

ही संपूर्ण घटना तेथे जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही जबरदस्त व्हारल होत आहे. 

कामाची मजुरी न मिळाल्याने संतापलेल्या एका तरुणाने, दिल्लीतील सदरपूर कॉलनीत थेट एका मर्सिडीजलाच पेट्रोल ओतून आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कारला आग लागवल्यानंतर बाईकवर आलेला हा तरुण घटनास्थळावरून फरार झाला. ही संपूर्ण घटना तेथे जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही जबरदस्त व्हारल होत आहे. 

सदरपूर गावातील रहिवासी आयुष चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मर्सिडीज घराबाहेरच उभी होती. 11 सप्टेंबरला एक तरूण बाईकवरून आला. त्याने त्याची बाइक कारच्या समोर उभी केली. यानंतर, त्याने कारवर पेट्रोल शिंपडून आग लावली आणि घटना स्थळावरून फरार झाला. खरे तर काही वेळाने ही आग अपोआप विझली. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

केवळ 32 सेकेंदांच्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कारला आग लावताना दिसत आहे. त्याने हेलमेट परिधान केले आहे. याप्रकरणी कार मालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, आरोपी रणवीर हा ग्रेटर नोएडातील रोजा जलालपूर गावचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली आहे.

घरात टाइल्स लावल्याची मजुरी दिली नाही - एसीपी रजनीश वर्मा यांनी दिलेल्यया माहितीनुसार, रणवीर हा मूळचा बिहारचा आहे. तो तेथून कामासाठी नोएडा येथे आला होता. तो घरांमध्ये टाइल्स बसवण्याचे काम करतो. आरोपीचा रणवीर याने दावा केला आहे, की आयुष चौहान यांनी त्यांच्या घरी त्याच्याकडून टाइल्स बसवून घेतल्या. चौहान यांच्याकडून त्याचे 2.68 लाख रुपयांचे येणे बाकी आहे. अनेकवेळा पैसे मागूनही पैसे न दिल्याने त्याने रागाच्या भरात त्यांची कार पेटवून दिली. तसेच, आयुष यांचे म्हणणे आहे, की त्यानी संबंधित आरोपीचे सर्व पेमेंट केले होते. तो खोटे बोलत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMercedes Benzमर्सिडीज बेन्झPoliceपोलिस