शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: पती, पत्नी आणि तीन मुली, एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या, भयावह हत्याकांडामुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 11:29 IST

Crime News: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. येथील नवाबगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील खागलपूर गावात काल रात्री हे निर्घृण हत्याकांड घडले.

प्रयागराज - उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. येथील नवाबगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील खागलपूर गावात काल रात्री हे निर्घृण हत्याकांड घडले. येथे राहुल तिवारी, त्यांची पत्नी प्रिती आणि तीन मुलींची हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडांचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार कौशांबी येथील हे कुटुंब नवाबगंज येथील खागलपूर गावात भाड्याच्या घरात राहत होते. हत्येची माहिती मिळाल्यावर नवाबगंज ठाणे पोलीस तत्काळ घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवले. फॉरेन्सिक एक्स्पर्ट्स आणि डॉग स्क्वॉडला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना काल रात्रीची आहे. सकाळी घराचा दरवाजा बंद होता. बराच वेळ घरातून काही हालचार दिसत नसल्याने शेजाऱ्यांना शंका आली. त्यांनी दरवाजा ठोठावून पाहिला. मात्र दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता राहुल यांचा मृतदेह हा लटकलेल्या अवस्थेत सापडला. तर राहुल यांची पत्नी आणि तीन मुलींचे मृतदेह बेडवर पडले होते. त्यांचा गळा कापून हत्या करण्यात आली होती.

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन शोक जाहीर केला आहे. तसेच अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून निष्पक्षपणे तपास करून दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशFamilyपरिवार