शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
2
'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
3
भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
4
Honda vs Suzuki: होन्डा अ‍ॅक्टिव्हा आणि सुझुकी अ‍ॅक्सेसमध्ये चुरस; कोण आहे 'स्मार्ट फीचर्स'चा खरा किंग? वाचा
5
खळबळजनक दावा! सत्ताधारी २१ आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; एकाच ठेकेदारानं दिल्या आलिशान डिफेंडर कार?
6
चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपा कार्यकर्त्यांना तंबी; "सर्वांचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर..."
7
मुलगा की मुलगी? नवजात अर्भकांच्या अदलाबदलीवरून दोन कुटुंबांमध्ये हॉस्पिटलमध्येच वाद
8
हेअर फॉलचा वैताग! लसूण की कांद्याचा रस... काळ्याभोर लांब, जाड केसांसाठी सर्वात बेस्ट काय?
9
भारतीय नौदल चीन, पाकिस्तान, तुर्कीला धक्का देणार! तीन पावले उचलली
10
लग्नानंतर तापसी पन्नूने सोडला देश? डेन्मार्कला शिफ्ट झाल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचं स्पष्टीकरण
11
Numerology: ५, १४, २३ तारखेला जन्मलेल्या मुलींवर असतो बुधाचा प्रभाव; अत्यंत बुद्धिमान असतो स्वभाव!
12
विराट कोहली दोनदा शून्यावर बाद; सुनील गावसकरांनी मांडलं सडेतोड मत, म्हणाले- दोन सामन्यात...
13
VIDEO: देसी महिलेचा धुमाकूळ! 'हुस्न तेरा तौबा' गाण्यावर इतका विचित्र डान्स कधीच पाहिला नसेल
14
मोजतानाही लागेल धाप! IPO येण्याआधीचं Jio कंपनीचं मूल्यांकन बाप रे बाप...!
15
Railway: रेल्वे ट्रॅकजवळ रील बनवणाऱ्यांची आता खैर नाही; प्रशासनानं उचललं कठोर पाऊल!
16
मुख्यमंत्री फडणवीस अन् मनोज जरांगे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार? चर्चांना उधाण...
17
Shraddha Walker : "श्रद्धा वालकरवर अजूनही अंत्यसंस्कार झालेच नाहीत"; आफताबने ३ वर्षांपूर्वी केलेली निर्घृण हत्या
18
Satara Crime: महिला डॉक्टरवर अत्याचार करणारा पीएसआय गोपाल बदने फरार; महिला आयोगाने घेतली दखल
19
Social Media Earning: इन्स्टाग्राम आणि युट्यूबवरून कसे कमवता येतात पैसे? तुम्हीही बनू शकता लखपती! जाणून घ्या
20
सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमधील RSS कार्यालयावर वंचितचा जनआक्रोश मोर्चा

भयंकर! सात जन्माचं नातं अवघ्या 8 दिवसांत तुटलं; प्रेमविवाहानंतर 'त्याने' पत्नीलाच संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 12:43 IST

Crime News : लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने या दोघांनी कोर्टात जाऊन लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर दोघांमध्ये सतत वाद होत असल्यानेच पतीने टोकाचं पाऊल उचललं आणि तिची हत्या केली.

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. प्रेमविवाहानंतर अवघ्या आठ दिवसांनी पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सात जन्माचं नातं अवघ्या 8 दिवसांत तुटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने या दोघांनी कोर्टात जाऊन लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर दोघांमध्ये सतत वाद होत असल्यानेच पतीने टोकाचं पाऊल उचललं आणि तिची हत्या केली. पत्नीच्या हत्येनंतर पती फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद आझाद खान असं 21 वर्षीय आरोपी पतीचं नाव असून त्याने पत्न किर्तीची हत्या केली. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे किर्तीसोबत प्रेमसंबंध होते. कामाच्या निमित्ताने त्यांची आधी ओळख झाली होती. त्यानंतर पुढे त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांचंही एकमेकांवर प्रेम असल्यामुळे त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या या लग्नाला कुटुंबीयांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर त्यांनी आठ दिवसांपूर्वीच कोर्टात जाऊन लग्न केलं होतं आणि आपल्या नव्या संसाराला सुरुवात केली होती. पण लग्नानंतर नातं बदललं. 

घरातून नेहमीच जोरजोरात भांडण्याचा यायचा आवाज

मोहम्मद आणि किर्तीमध्ये अनेक गोष्टींवरून वाद होण्यास सुरुवात झाली. त्यांच्या घरातून नेहमीच जोरजोरात भांडण्याचा आवाज येत असल्याची माहिती त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मंडळींनी दिली आहे. हत्या झाली त्यादिवशी देखील त्यांच्यात मोठं भांडण झालं आणि किर्ती जोरात किंचाळली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी घरी आले तेव्हा ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि मोहम्मद घरातून गायब झाला होता. शेजाऱ्यांनी कीर्तीच्या भावाला फोन करून घटनेची माहिती दिली.

आठ दिवसांतच किर्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का

पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झालें. त्यावेळी किर्तीच्या शरीरावर वार केलेले दिसून आलं.मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवून देण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेजाऱ्यांनी देखील या दोघांमध्ये सतत वाद होत असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. लग्नानंतर आवघ्या आठ दिवसांतच किर्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस