शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

पतीने पकडले पाय, दिराने हात अन् जीव जाईपर्यंत गळा दाबत राहिला बाप! ऐकून होईल काळजाचं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 10:58 IST

खैरागड या गावात राहणाऱ्या एका महिलेला तिच्याच कुटुंबाने अतिशय क्रूरपणे संपवले आहे. पतीने या महिलेचे पाय पकडले, तर दिराने हात पकडून ठेवले आणि पित्यानेच तिचा गळा दाबायला सुरुवात केली.

उत्तर प्रदेशातून एक अतिशय धक्कादायक हत्या प्रकरण समोर आले आहे. आग्र्यातील खैरागड या गावात राहणाऱ्या एका महिलेला तिच्याच कुटुंबाने अतिशय क्रूरपणे संपवले आहे. पतीने या महिलेचे पाय पकडले, तर दिराने हात पकडून ठेवले आणि पित्यानेच तिचा गळा दाबायला सुरुवात केली. या दरम्यान महिला जिवाच्या आकांताने ओरडून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, एकालाही तिची दया आली नाही. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. 

शनिवारी ३१ मे रोजी खैरागडच्या भोपूर गावात एका महिलेचा मृतदेह आढळला. या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. ते फोटो पाहून मृत महिलेचे वडील कोमल सिंह यांनी पोलिसांना फोनवरून संपर्क केला. या महिलेचे नाव सुनीता असून ती आपल्या कुटुंबासह आग्र्यात राहत होती.

पोलिसांना आला संशय

वडिलांनी ओळख पटवल्यावर सुनीताचा मृतदेह तिच्या घरी नेण्यात आला. तिचा देह पाहून वडिलांनी रडण्याचं नाटक तर केलं. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी कुटुंबाची चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र, या चौकशीत सुनीता आणि तिच्या पतीमध्ये वाद सुरू असल्याचे समोर आले. यामुळेच सुनीता काही दिवस तिच्या माहेरी राहण्यासाठी आली होती. या चौकशीनंतरही पोलिसांना सुनीताच्या वडिलांवर संशय कायम होता.   

बहिणीने सांगितलं सत्य

सुनीताची बहीण पूजा हिने पोलिसांना फोन करून सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला. पूजाने पोलिसांना सांगितले की, सुनीताचा पती तिला सतत मारहाण करायचा. दोघांचे संबंध चांगले नव्हते. या दरम्यान सुनीता तिचा चुलत दीर विष्णु याच्या प्रेमात पडली होती. दोघांना एकमेकांशी लग्न करायचे होते. आपण स्वतः सुनीताला माहेर घेऊन आलो होतो, असे देखील पूजाने सांगितले.

या प्रकरणात विष्णूचे नाव समोर येताच, पोलिसांनी विष्णूबद्दल माहिती गोळा केली आणि सुनीताबद्दल माहिती मिळविण्यासाठी त्याच्याशी संपर्क साधला. विष्णूने पोलिसांना सांगितले की, सुनीताने २९ मे, शुक्रवारी रात्री त्याला फोन करून सांगितले होते की, तिचे वडील आणि पती तिला मारून टाकतील. सुनीताने फक्त एवढेच बोलून फोन ठेवला होता. यानंतर विष्णू सुनीताच्या वडिलांना अनेक वेळा फोन केला, पण त्यांनी एकदाही त्याचा फोन उचलला नाही. यानंतर त्याने सुनीताची बहीण पूजाला याबद्दल माहिती दिली.

तिन्ही आरोपींना अटक जेव्हा विष्णूने पूजाला सुनीताबद्दल सांगितले, तेव्हा पूजा तिच्या आईच्या घरी पोहोचली. पूजा म्हणाली की, आई त्यावेळी खूप घाबरली होती आणि तिने मला घाबरून सांगितले की, सुनीता आता कधीच परत येणार नाही. कारण तिच्या वडिलांनी तिचा नवरा आणि दीर जल सिंह यांच्यासोबत मिळून तिची हत्या केली आहे. पूजाने सांगितले की, त्यांनी तिच्या आईलाही धमकी दिली होती. यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून त्यांची चौकशी केली.

मृतदेह आणून खैरागडमध्ये टाकलापोलिसांनी ताब्यात घेताच वडील, पती आणि दिराने महिलेची हत्या केल्याची कबुली दिली. सुनीताच्या वडिलांना वाटले की, त्यांच्या मुलीच्या अनैतिक  संबंधांमुळे त्यांची बदनामी होत आहे. अशा परिस्थितीत, आपली अब्रू वाचवण्यासाठी मुलीला मारण्याचा कट रचला. यात त्यांनी मुलीचा पती आणि दीर यांचीही साथ मागितली. तिघांनी मिळून धोलपूरमध्येच तिची हत्या केली. यानंतर सुनीताचा मृतदेह दुचाकीवरून खैरागड येथे घेऊन गेले आणि तिथे फेकून दिला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यू