शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नी और वो! प्रेयसीसोबत लग्न करायला निघाला पती; पत्नीने रस्त्यात गाठलं, धू-धू धुतलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 17:18 IST

एक व्यक्ती आपल्या प्रेयसीसोबत कोर्ट मॅरेज करण्यासाठी तिला घेऊन गुपचूप जात होता. याच दरम्यान त्याची पत्नी आणि सासरकडच्या लोकांनी त्याला पकडलं.

नवी दिल्ली - बिहारच्या कटिहारमध्ये 'पती-पत्नी और वो' अशी एक घटना समोर आली आहे. एक व्यक्ती आपल्या प्रेयसीसोबत कोर्ट मॅरेज करण्यासाठी तिला घेऊन गुपचूप जात होता. याच दरम्यान त्याची पत्नी आणि सासरकडच्या लोकांनी त्याला पकडलं. यानंतर सासरकडच्या लोकांनी आपल्या जावयाला खांबाला बांधलं आणि त्याची यथेच्छ धुलाई केली. सासरकडच्या लोकांनी सांगितलं की जोपर्यंत त्यांचा जावई सुधारणार नाही, तोपर्यंत त्याची धुलाई केली जाईल. हे प्रकरण कटिहारच्या आजमनगर ठाण्याच्या मल्लिकपूर गावातील असल्याचं सांगितलं जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आबिद खानचं लग्न सना खातून हिच्यासोबत झालं होतं. लग्नानंतर सर्व काही ठीक होतं. काही महिन्यांनंतर आबिद मजूरी करण्यासाठी मुंबईला गेला. इथून तो दर महिन्याला आपल्या पत्नीला पैसे पाठवत असे. मात्र, 2020 नंतर आबिदने पैसे पाठवणं अचानक बंद केलं. सना खातूनचं असं म्हणणं आहे, की मुंबईमध्ये आबिदला दुसऱ्या मुलीवर प्रेम झालं. ही मुलगी कटिहारच्याच शेजारील गाव तेलता माधोपूर येथील रहिवासी होती. ती अनेकदा मुंबईत जात-येत असे. 

आबिदने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि कोर्ट मॅरेजसाठी तयार केलं. शनिवारी आबिद आपल्या प्रेयसीला घेऊन कोर्ट मॅरेज करण्यासाठी निघाला होता. याची माहिती मिळताच पत्नीने कोर्टात पोहोचण्याआधीच त्याला प्रेयसीसह रस्त्यात पकडलं. यानंतर तिने आपल्या घरच्या लोकांना याबद्दल माहिती दिली. कुटुंबीय लगेचच तिथे पोहोचले आणि आबिदा पकडून खांबाला बांधलं आणि त्याची धुलाई केली.

आबिदच्या सासरकडच्या लोकांचं असं म्हणणं आहे की दोघांच्या परवानगीचे आबिद आणि सनाचं लग्न केलं गेलं होतं. आता त्याला आपल्या पत्नीला सोडून दुसऱ्या तरुणीसोबत राहायचं आहे. आबिद आपल्या पत्नीसोबत चुकीचं वागत आहे. यामुळे त्याला अद्दल घडवण्यासाठी खांबाला बांधून त्याला मारहाण केल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वत्र याच गोष्टीची चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी