शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: शॉकींग! घरातील सोफासेटमध्येच तिचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 16:22 IST

Crime News: सुप्रिया किशोर शिंदे अस हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. डोंबिवली पूर्वेकडील दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरात शिंदे कुटुंबीय राहतं. सुप्रिया ही घरात एकटीच होती

कल्याण-डोंबिवली : डोंबिवली नजीक असलेल्या दावडी परिसरात एक धक्कादायक घडली आहे. एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह तिच्याच घरातील सोफा सेटमध्ये कोंबून ठेवण्यात आला. गळा दाबून या महिलेला मारल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, तिच्याच घरात हत्या करून तेथील सोफा सेटमध्ये मृतदेह कोंबण्याचा धक्कादायक प्रकार कोणी केला? ही बाब शोधून काढण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखक करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

सुप्रिया किशोर शिंदे अस हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. डोंबिवली पूर्वेकडील दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरात शिंदे कुटुंबीय राहतं. सुप्रिया ही घरात एकटीच होती. तिचा मुलगाही शाळेत गेला होता. सुप्रिया ही शाळेत आपल्या मुलाला घ्यायला गेली नसल्यानं फोनाफोनी सुरु झाली. शेजाऱ्यांकडे ठेवण्यात आलेल्या चावीनं दरवाजा उघडण्यात आला. मात्र, सुप्रिया आढळून आली नाही. दरम्यान तिचे पती किशोर शिंदे हे सुद्धा संध्याकाळी उशिरा घरी पोहचले. मात्र, पत्नीचा काही ठावठिकाणा लागत नसल्यानं त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. 

दरम्यान, शिंदे यांच्या घरात नातेवाईक आणि शेजारी जमले . त्यांना सोफा सेटमध्ये काहीतरी संशयास्पद वाटले. सोफ्याची तपासणी केली असता यात  सुप्रियाचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन हादरली. सध्या काही लोकांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं समजतं आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याणPoliceपोलिसkdmcकल्याण डोंबिवली महापालिका