शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: महिलेला फूस लावून शेकडो किमी दूर घेऊन गेला, बलात्कार केला, मग मागितली माफी, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 17:53 IST

Crime News: राजस्थानमधील बांसवाडा पोलिसांनी घर सोडून दिल्लीला जात असलेल्या महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका बाबाला अटक केली आहे. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला दोन दिवसांची रिमांड सुनावली आहे.

जयपूर - राजस्थानमधील बांसवाडा पोलिसांनी घर सोडून दिल्लीला जात असलेल्या महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका बाबाला अटक केली आहे. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला दोन दिवसांची रिमांड सुनावली आहे. आरोपी बाबा पीडित महिलेला नोकरी लावण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. त्यानंतर त्याने मध्य प्रदेशमधील नीचम येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने या चुकीसाठी महिलेकडे माफी मागितली. या घटनेनंतर तो बाबा या महिलेला घेऊन जात होता. तेवढ्यात या महिलेने आरडाओरडा करून गर्दी जमवली. त्यानंतर जमावाने या बाबाला बेदम मारहाण केली आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, या परिसरातील एका महिलेचं चार दिवसांपूर्वी पतीशी भांडण झालं होतं. पतीवर रागावून ही महिला आपल्या एक वर्षाच्या मुलाला घेऊन घरातून निघून गेली. एक रात्र तिने एका चावडीवर घालवली. दुसऱ्या दिवशी लसोडियामध्ये बांधकाम सुरू असलेल्या गोशाळेत देखभाल करत असलेल्या बाबा रामस्वरूप उर्फ राजेंद्र मीणाची नजर तिच्यावर गेली. त्याने महिलेचं दु:ख ऐकलं आणि तिला रोजगार देण्याचे आमिष दाखवून आपल्यासोबत दुचाकीवरून नेलं.

त्यानंतर आरोपी बाबा महिला आणि तिच्या मुलाला घेऊन कोटाऐवजी १५८ किमी दूर मध्य प्रदेशमधील नीमच येथील भादवा माता मंदिरात घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी त्याने महिलेला आंघोळीसाठी नदीवर जाण्यास सांगितले. ती नदीवर गेल्यावर तोही तिच्या मागून गेला आणि त्याने त्या महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर या चुकीसाठी त्याने तिची माफीही मागितली.

दरम्यान, हा बाबा या महिलेला कोटा येथे परत आणत असताना एकेठिकाणी गर्दी पाहून महिलेने आरडाओरड केली. त्यामुळे जमाव गोळा झाला. तिथे या महिलेने तिची कहाणी ऐकवली. त्यानंतर जमावाने या बाबाला पकडले आणि त्याला बेदम मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थान