शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नवरी जोमात, नवरदेव कोमात! सासरच्यांना दिल्या झोपेच्या गोळ्या; दागिने, पैसे घेऊन झाली पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 17:03 IST

Crime News : लग्नानंतर सासरी आलेल्या नवरीने नवरदेवालाच गंडा घातल्याची घटना घडली आहे.

नवी दिल्ली - देशात फसवणुकीच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर सासरी आलेल्या नवरीने नवरदेवालाच गंडा घातल्याची घटना घडली आहे. रोहतकमध्ये ही घटना घडली आहे. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांत दागिने आणि पैसे घेऊन नवरी पळून गेल्याने सासरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवरीने सासरच्यांना झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर ती घरातील सोन्याचे दागिने आणि काही पैसे घेऊन पसार झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहतकच्या बोहर गावामध्ये ही घटना घडली आहे. 

सुरेश कुमार नावाच्या एका व्यक्तीने काही लोकांच्या फसवणुकीला बळी पडून छत्तीसगडच्या एक तरुणीसोबत कोर्टात लग्न केलं. ती तरूणी त्याच्यापेक्षा वयाने दहा वर्षे मोठी होती. लग्नासाठी त्याने मध्यस्थी असलेल्या लोकांना 70 हजार रुपये देखील दिले. लग्नानंतर ती तरुणी कुटुंबात मिसळून गेली. सर्वांशी चांगलं वागून तिने सर्वांचं मन जिंकलं. त्यामुळेच तिच्यावर सासरच्या मंडळींचा खूप विश्वास होता. मात्र आता सासरच्या मंडळींना झोपेच्या गोळ्या देऊन ती घरातील दागिने आणि पैसे घेऊन पसार झाली आहे. 

लग्नानंतर दागिने, पैसे घेऊन नवरी पळाली

पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तरुण जेव्हा पोलिसांकडे तक्रार घेऊन आला तेव्हा पोलिसांनी त्य़ाला दोन, तीन दिवस पाट पाहायला सांगितली. ती कदाचित परत येईल असं म्हटलं, पण नवरी काही परत आली नाही. सुरेश कुमार यांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने आपल्या आईच्या ऑपरेशनसाठी जवळपास 70 हजार जमा केले होते. तसेच त्याच्या घरामध्ये काही दागिने देखील होते. पण नवरी हे सर्व पैसे आणि दागिने घेऊनच पळून गेली आहे. य़ा घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस आरोपी तरुणीचा शोध घेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

माणुसकीला काळीमा! चोरीच्या संशयावरून मुलाला मारहाण, गाडीला बांधून दिला विजेचा शॉक

बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलाला मोबाईलची चोरी केल्याच्या आरोपावरून जमावाने त्याला मारहाण करत विजेचा शॉक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीचा मोबाईल चोरला असा आरोप मुलावर करण्यात आला. त्यानंतर जमावाने या मुलाला पकडून गाडीला बांधलं आणि मारहाण केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. 

 

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसMONEYपैसा