शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन गेम खेळताना झाली मैत्री, तरुणीला हॉटेलमध्ये बोलावून नग्न व्हिडीओ बनवला; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 15:07 IST

तरुणीसोबत गेम खेळताना ओळख झाली. ओळखीतून दोघांची मैत्री झाली.

ऑनलाईन पब्जी गेम खेळण्यातून तरुणी तरुणीची ओळख आणि यातून झालेले गुन्हे असे अनेक फ्रकरणे समोर आली आहेत. हरियाणातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हरियाणा येथील एका तरुणाची ऑनलाईन गेम खेळत असताना एका तरुणीशी ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. यानंतर या दोघांनी समोरासमोर भेटायचं ठरवलं. पण, या भेटीत तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडल्याचे फ्रकरण समोर आले आहे. 

Video: बेईमान डॉगी... चोरट्याच्या प्रेमात फसला अन् मालकाची १ लाखांची दुचाकी चोरी

मिळालेली माहिती अशी, गेम खेळता खेळता तरुणाने तरुणीला आपल्या जाळ्यात अडकवले आणि तिला भेटण्यासाठी जयपूरला बोलावले. त्यानंतर तरुणी त्याला भेटायला गेली.तरुणाने यावेळी तरुणीचा अश्लिल व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल केले. आरोपी तरुणाने पीडितेवर दोन वर्षे अनेकवेळा बलात्कार केला, अखेर तरुणीने पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. 

जयपूरच्या बजाजनगर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या अहवालानुसार, प्रताप नगर हल्दीघाटी मार्गाजवळ राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीने सांगितले की, ती सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आणि मोकळ्या वेळेत ऑनलाइन गेम खेळायची. सप्टेंबर २०१९ मध्ये हा गेम खेळत असताना हरियाणातील शुभम नावाच्या तरुणाशी संवाद झाला. त्यानंतर दोघांनी पार्टनर म्हणून PUBG खेळायला सुरुवात केली. PUBG गेम खेळत असताना दोघांमध्ये खूप चर्चा झाली आणि त्यानंतर त्याने मोबाईल नंबर मागितला, त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. 

यानंतर जुलै २०२१ मध्ये आरोपी तरुण तरुणीला भेटण्यासाठी जयपूरला पोहोचला. जिथे त्याने गांधीनगर रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये रूम बुक केली आणि नंतर तिला भेटण्याच्या बहाण्याने बोलावले. जेव्हा ती हॉटेलमध्ये पोहोचली तेव्हा सुरुवातीला आरोपीने सामान्य संभाषण सुरू केले पण त्यानंतर तो जबरदस्ती करु लागला. यानंतर पीडितेवर अत्याचार केला आणि त्याचा अश्लील व्हिडीओ बनवला. त्यानंतर लग्नाच्या बहाण्याने २ वर्षे तिच्यावर अत्याचार करत होता. ब्लॅकमेल करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर हिंमत दाखवत पीडितेने पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपी तरुणाच्या कृत्यांविरोधात गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस