शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नात्याला काळीमा! जन्मदाताच झाला हैवान; लेकीवर केला बलात्कार, मुलगी 7 महिन्यांची गरोदर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 16:26 IST

Crime News : जन्मदाताच हैवान झाला असून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे.

नवी दिल्ली - देशात महिलांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याच दरम्यान नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. जन्मदाताच हैवान झाला असून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशच्या खजरानामध्ये हा संतापजनक प्रकार घडला. धक्कादायक बाब म्हणजे मुलगी आता सात महिन्यांची गरोदर आहे. मुलीने आजीला आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितल्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या वडिलांनी आणि शेजारी राहणाऱ्या एक व्यक्तीने मुलीवर बलात्कार केला आहे. मार्च 2021 पासून हे दोघेही तिचं लैंगिक शोषण करत आहेत. घाबरलेल्या मुलीने इतके महिने याबाबत कोणालाच सांगितलं नाही. शेवटी त्रास सहन होत नसल्याने तिने आपल्यासोबत घडत असलेला धक्कादायक प्रकार आजीला सांगितला. आजीला या घटनेची माहिती मिळताच तिने लगेचच पोलिसांत धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. 

मुलीने आजीला सांगितला भयंकर प्रकार मग घडलं असं काही... 

खजराना पोलीस ठाण्याचे अधिकारी दिनेश वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 15 वर्षांच्या मुलीला तिची आजी पोलीस ठाण्यामध्ये घेऊन आली होती. तिची नात ही सात महिन्यांची गरोदर असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. जेव्हा पोलिसांनी मुलीकडे याबाबत चौकशी केली तेव्हा तिने वडील आणि शेजारी राहणारा व्यक्ती सातत्याने आपल्यावर बलात्कार करत असल्याची माहिती दिली. दोघेही नेहमी घाबरवत असतं. तसेच जीवे मारण्याची धमकी देत असत असं मुलीने सांगितलं. 

पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपींना केली अटक

पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2021 पासून वडील आणि शेजारी राहणारा कुंदन आपल्यावर बलात्कार करत आहे. त्यामुळे याची माहिती आता आजीला दिली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींना अटक केली आहे. य़ा दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तसेच मुलीची मानसिक अवस्था आता ठिक नसल्याने तिचं समुपदेशन करण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस