शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

खळबळजनक! 'माझ्या मृत्यूला माझी पत्नी जबाबदार'; फेसबुकवर सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 16:15 IST

Crime News : सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवल्याची भयंकर घटना समो आली आहे. '

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. 'माझ्या मृत्यूला माझी पत्नी जबाबदार आहे' असं म्हणत फेसबुकवर सुसाईड नोट लिहिली आहे. तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणाला सासरची मंडळी आणि पत्नी यांनी मारहाण केली होती. त्यामुळेच त्याने टोकाचा निर्णय घेतला.  

मिळालेल्या माहितीनुसार, भूपेंद्र असं तरुणाचं नाव असून तो अहमदाबादमध्ये नोकरी करत होता. त्याचे वडील राम बहादूर दिवाकर यांनी दिलेल्य़ा माहितीनुसार, भूपेंद्रचं लग्न 2016 मध्ये रुकवा गावच्या मूर्ती देवी सोबत झालं होतं. त्यानंतर ते दोघं अहमदाबादमध्ये राहत होते. रविवारी संध्याकाळी अचानक मुलगा घरी आला आणि आम्हाला त्याने सासरच्या मंडळींनी त्याला बेदम मारहाण केल्याचं सांगितलं. यानंतर त्याने खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाला गळफास घेतलेलं पाहून कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तरुणाच्या आईवडिलांनी सुनेच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. तरुणाने मृत्यू आधी फेसबुकवर सुसाईड नोट लिहिली होती. ज्यामध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी आपल्या पत्नीला जबाबदार धरलं आहे. तसेच त्याने पत्नीच्या नावाचा एक टॅटू काढला होता. मात्र तो देखील आत्महत्येआधी त्याने सुरीने वार करुन मिटवण्याचा प्रयत्न केला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

धक्कादायक! 'तो' वाद विकोपाला गेला; पतीच्या एका शब्दामुळे नाराज झालेल्या पत्नीने कापली जीभ

पती- पत्नीमध्ये अनेकदा कौटुंबिक कारणांवरून वाद होत असतात. काही वेळा हे वाद विकोपाला देखील जातात अशीच एक घटना आता घडली आहे. उत्तर प्रदेशमध्ये पतीसोबत झालेल्या किरकोळ वादातून एका महिलेने टोकाचं पाऊल उचललं आहे. पतीचा एक शब्द जिव्हारी लागल्याने पत्नी खूप नाराज झाली होती. तिने ब्लेडने स्वतःची जीभ कापून रस्त्यावर फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यात ही भयंकर घटना घडली आहे. जिल्ह्यातील रसूलपूर नागला गावात हा प्रकार घडला. पती पत्नीमध्ये काही तरी किरकोळ कारणांवरून वाद सुरू झाला. त्यांच्यातील भांडणामध्ये पतीने पत्नीवर ओरडत तिला वाद घालणारी म्हटलं आणि तोच शब्द पत्नीच्या जिव्हारी लागला. पतीच्या शब्दांमुळे दुखावलेल्या पत्नीने धक्कादायक पाऊल उचललं.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यू