शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 10:04 IST

Crime news Divorce Alimony: घटस्फोट झाल्यानंतर महिला दुसरा जीवनसाथी शोधत असतात. अशा महिलांना हेरणारे देखील या समाजात वावरत असतात. कारण या महिलांकडे पोटगीद्वारे लाखो, करोडो रुपये आलेले असतात.

पुण्यामध्ये घटस्फोटीत महिलेसोबत मोठी घटना घडली आहे. पहिल्या नवऱ्यापासून तिला पोटगीत पाच कोटी रुपये मिळाले होते, दुसऱ्या लग्नाच्या प्रयत्नात असलेल्या या महिलेला ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या अनिवासी भारतीयाने चांगलाच गंडा घातला आहे. तिचे साडेतीन कोटी रुपये घेऊन पोबारा केला आहे. या महिलेने पुणे पोलिसांकडे दाद मागितली होती, यावरून पुणे पोलिसांनी या भामट्या एनआरआय तरुणाला मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. 

घटस्फोट झाल्यानंतर महिला दुसरा जीवनसाथी शोधत असतात. अशा महिलांना हेरणारे देखील या समाजात वावरत असतात. कारण या महिलांकडे पोटगीद्वारे लाखो, करोडो रुपये आलेले असतात. या पैशांवर या भामट्या लोकांचा डोळा असतो. अशाच जाळ्यात ही घटस्फोटीत महिला अडकली आणि आरोपीने मॅट्रीमोनिअल साईटवर खोटे प्रोफाईल बनवून या महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले . 

या महिलेने देखील आपल्याकडे पहिल्या पतीने दिलेले पोटगीचे पाच कोटी रुपये असल्याचे त्याला सांगून टाकले. आरोपीने त्याचे नाव डॉ. रोहित ओबेरॉय असल्याचे महिलेला सांगितले होते. परंतू या आरोपीचे खरे नाव अभिषेक शुक्ला असे असून तो लखनऊचा राहणारा आहे. त्याच्याकडून ऑस्ट्रेलियाई पासपोर्ट सापडला आहे. बुधवारीच त्याला मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. 

महिलेने एकूण ₹3,60,18,540 रुपये वेगवेगळ्या खात्यातून त्याला पाठविले होते. यानंतर आरोपीने तिला आपण आजारी असल्याचे सांगितले. तोंडाचा कॅन्सर झाला आहे आणि हळूहळू तिने तिच्याशी संपर्क थांबविला. अचानक या महिलेला सप्टेंबर २०२४ मध्ये विन्सेंट कुआन नावाचा एक मेल आला की डॉ. रोहित ओबेरॉय याचा मृत्यू झाला आहे. या महिलेला संशय आल्याने तिने तिच्या एका मित्राला याची माहिती दिली होती. त्याने तिला फसवणूक झाल्याचे सांगितले. यामुळे तिने नोव्हेंबर २०२४ ला पुणे पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी लुक आऊट सर्क्युलर जारी केले. या शुक्लाने ओबेरॉयच्या नावाने जवळपास ३१९४ महिलांना या मॅट्रीमोनिअल वेबसाईटद्वारे मेसेज पाठविलेले होते. यामुळे या ठगाने अनेकींना फसविले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Divorceघटस्फोटPuneपुणे