शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! व्यावसायिकावर भररस्त्यात झाडल्या गोळ्या, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 15:03 IST

Crime News : अपूर्व यांना चार गोळ्या लागल्या असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. दिल्लीत अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. दिल्लीत एक व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला आहे. भररस्त्यात गोळ्या (Firing) घालून व्यावसायिकाची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गोळीबाराची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या व्यावसायिकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपूर्व जैन असं 32 वर्षीय व्यावसायिकाचं नाव आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, अपूर्व जैन हे व्य़ावसायिक असून ते आपल्या फॅक्ट्रीपासून आपल्या कारपर्यंत येत होते. त्याचवेळी त्यांच्यावर नजर ठेवून असलेले आरोपी त्यांच्याजवळ आले आणि कारच्या मागून त्यांनी अपूर्व यांच्यावर गोळीबार सुरू केला. अपूर्व यांना चार गोळ्या लागल्या असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपूर्व यांच्यावर आरोपी गोळीबार करताना कैद झाले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भयंकर! चेटकीण असल्याच्या संशयातून महिलेची हत्या; 6 वर्षीय लेकाने सांगितला घडलेला धक्कादायक प्रकार

चेटकीण असल्याच्या संशयातून एका महिलेची हत्या करण्याची आल्याची भयंकर घटना घडली आहे. 6 वर्षीय लेकाने आपल्या आईसोबत घडलेला सर्व धक्कादायक प्रकार सांगितल्याने ही घटना उघडकीस आली आहे. झारखंडच्या पलामू-विश्रामपूरमध्ये एका महिलेची मान कापून हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. बुधवारी सकाळी माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार घडला आहे. महिलेच्या सहा वर्षीय मुलाने आपल्या आईसोबत काय झालं याची माहिती पोलिसांना दिली आहे. मुलाने दिलेल्या माहितीनुसार, पाच जण अचानक घरात घुसले. त्यांनी आईला बेदम मारहाण करायला सुरुवात केली आणि तिला घराबाहेर काढलं. त्यानंतर तिची मान कापली. चिमुकल्याने आरोपींमध्ये आपल्या सख्ख्या काकाचं देखील नाव घेतलं आहे. एक महिन्यापूर्वी शेजारी राहणाऱ्या एका मुलीचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून महिलेवर संशय घेतला जात होता. महिलेला काही लोकांनी धमकी देखील दिली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिसFiringगोळीबार