शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: आरोपी पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला, उस्मानाबाद जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 09:49 IST

Crime News: आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या परंडा पोलीस पथकाच्या डोळ्यांत चटणी टाकून काठ्या-कुऱ्हाडीने मारहाण केल्याची घटना सोमवार व मंगळवारच्या मध्यरात्री परंडा शहरानजीक घडली आहे.

परंडा (जि. उस्मानाबाद) : आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या परंडा पोलीस पथकाच्या डोळ्यांत चटणी टाकून काठ्या-कुऱ्हाडीने मारहाण केल्याची घटना सोमवार व मंगळवारच्या मध्यरात्री परंडा शहरानजीक घडली आहे. या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. परंडा शहराजवळ असलेल्या वस्तीवरील काही जणांविरुद्ध तक्रार होती. औदुंबर प्रकाश पाटील यांच्या शेतीच्या वादातून हा गुन्हा दाखल झालेला होता. त्याच्या तपासासाठी परंडा ठाण्यातील पोलीस पथक पाटील वस्तीवरील उमाकांत पाटील यांच्याकडे चौकशीसाठी गेले होते. चौकशी दरम्यान तपासप्रमुख उपनिरीक्षक राजकुमार ससाणे व उमाकांत पाटील यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. याचे पर्यवसान हाणामारीत झाले. उमाकांत पाटील, कृष्णा उमाकांत पाटील,  रामराजे उमाकांत पाटील, पल्लवी उमाकांत पाटील,  मुकुंद उमाकांत पाटील, गोविंद उमाकांत पाटील यांनी  कोयता, दगड, काठीने मारहाण करुन तपास पथकावर हल्ला चढवला. 

पथकातील महिला  कर्मचारी शबाना मुल्ला यांनी तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस कुमक घटनास्थळी पोहोचताच पाटील कुटुंबीयांनी पोलिसांच्या डोळ्यांत चटणी फेकून तुफान दगडफेक केली. या घटनेत उपनिरीक्षक राजकुमार ससाणे यांच्यासह काही कर्मचारी जखमी झाले. त्यांच्यावर परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी परंडा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घरात डांबून मारहाणतपास प्रथकाचे प्रमुख उपनिरीक्षक राजकुमार ससाणे यांना आरोपी पाटील कुटुंबीयांनी त्यांच्या घरात डांबून मारहाण केली. त्यांच्याही डोळ्यांत चटणी टाकून काठीने मारहाण करण्यात आली. तब्बल दोन तास हा प्रकार सुरू होता. पोलिसांची कुमक आल्यानंतर पाटील कुटुंबातील अनेकांनी पळ काढला. यानंतर जखमी ससाणे यांची सुटका झाली.   

दोघे ताब्यात, चौघे पसार पोलीस पथकावर झालेल्या हल्ल्याची माहिती कळल्यानंतर परंडा पोलिसांची कुमक घटनास्थळावर दाखल झाली. मोठा फौजफाटा पाहून अंधाराचा फायदा घेत उमाकांत पाटील, रामराजे उमाकांत पाटील, मुकुंद उमाकांत पाटील, गोविंद उमाकांत पाटील हे पसार झाले. तर पोलिसांनी पल्लवी उमाकांत पाटील, कृष्णा उमाकांत पाटील यांना ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस