शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: रोकड, लाखो रुपयांचे दागिने, जमीनजुमला, अभियंत्याकडे सापडली ५ कोटींची रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 06:23 IST

Crime News: बिहारच्या ग्रामीण विकास खात्यातील किशनगंज विभागाचा कार्यकारी अभियंता संजयकुमार राय याच्याशी संबंधित पाच ठिकाणांवर दक्षता विभागाने शनिवारी टाकलेल्या धाडींदरम्यान पाच कोटी  रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली.

पाटणा : बिहारच्या ग्रामीण विकास खात्यातील किशनगंज विभागाचा कार्यकारी अभियंता संजयकुमार राय याच्याशी संबंधित पाच ठिकाणांवर दक्षता विभागाने शनिवारी टाकलेल्या धाडींदरम्यान पाच कोटी  रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली. रोख रक्कम मोजणारी यंत्रे मागवून या नोटा मोजण्यात आल्या. संजयकुमार राय याच्या लाचखोरीबद्दल आलेल्या तक्रारींनंतर दक्षता विभागाने या धाडी टाकल्या.

संजयकुमार राय याच्याशी संबंधित पाटणा येथील दोन व किशनगंज येथील तीन ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. त्यात पाटणामधून एक कोटी व किशनगंज येथून चार कोटी रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली. संजयकुमार राय याचे पाटणा येथील वसंत विहार कॉलनीमध्ये घर आहे. परंतु, तो सध्या किशनगंज जिल्ह्यात कार्यरत आहेत. दक्षता विभागाच्या दोन पथकांनी शनिवारी सकाळी सात वाजता पाटणा व किशनगंज येथे धाडी टाकल्या.

किशनगंज येथे दक्षता विभागाच्या १३ अधिकाऱ्यांच्या पथकाने राय याच्या रुईधाशा, आणखी एक अभियंता ओमप्रकाश यादव याच्या लाईनपाडा व त्याच्या कार्यालयातील रोखपाल खुर्रम सुल्तान याच्या लाइनपाडा येथील निवासस्थानी धाडी टाकल्या. लाच म्हणून मिळालेले पैसे राय याच्यावतीने ओमप्रकाश यादव स्वीकारत असे. राय व अन्य दोघांच्या बँक खात्यातील व्यवहारांचीही दक्षता विभाग तपासणी करणार आहे. (वृत्तसंस्था)

लाखो रुपयांचे दागिने, जमीनजुमलाराय याच्या कार्यालयातील आणखी एक अभियंता ओमप्रकाश यादव याच्या घरी ४ कोटी रुपयांची रोख रक्कम मिळाली तर रोखपालाच्या घरात सुमारे काही लाख रुपयांचे घबाड मिळाले. तर राय याच्या पाटणा येथील घरातून एक कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. त्याशिवाय राय याच्याकडे लाखो रुपयांचे दागिने सापडले असून, त्याने जमीनजुमला खरेदी केल्याची व विविध ठिकाणी आर्थिक गुंतवणूक केल्याची कागदपत्रे दक्षता विभागाने ताब्यात घेतली आहेत.

टॅग्स :BiharबिहारraidधाडCorruptionभ्रष्टाचारCrime Newsगुन्हेगारी