शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : नगरसेवकाच्या अंत्यसंस्कारावेळी सख्ख्या भावांवर तलवारीने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 05:40 IST

जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार

उल्हासनगर : शिवसेना नगरसेवक आकाश पाटील (३२) यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर स्मशानभूमीतून बाहेर पडत असताना रिक्षातून आलेल्या हल्लेखोरांनी प्रसाद व बाबू पाटील या भावांवर हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांना डाेंबिवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेे आहे. याप्रकरणी हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

उल्हासनगरमधील कैलास कॉलनी परिसरातील शिवसेना नगरसेवक आकाश पाटील यांचे रात्री हृदयविकाराने निधन झाले. शेकडो जणांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी २.३० वाजता कॅम्प क्रमांक ५ येथील समतानगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. स्मशानभूमी परिसरातून बाहेर पडत असताना रिक्षातून आलेल्या एका हल्लेखोर टोळक्याने पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या प्रसाद व बाबू या सख्ख्या भावांवर तलवारीने हल्ला केला.

या प्रकारामुळे तेथे उपस्थितीत नागरिकांची पळापळ झाली. काही नागरिकांनी हिंमत करून एका हल्लेखोराला पकडून हिललाइन पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले, तर इतर हल्लेखोर रिक्षा तिथेच टाकून पळून गेले. 

रिक्षासह तलवारी, चाॅपर जप्तनागरिकांनी पकडलेल्या हल्लेखोराची चाैकशी सुरू असल्याची माहिती पाेलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.  हल्ल्यात जखमी झालेले सख्खे भाऊ असून, हल्लेखोर कैलास कॉलनी, जुने अंबरनाथ परिसरातील असल्याचा संशय आहे. याप्रकरणी हिललाइन पोलीस तपास करीत आहेत. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल, असे मोहिते यांनी सांगितले. हल्ल्यात वापरलेली रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यामध्ये तलवारी, चॉपर आदी घातक शस्त्रे सापडली आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरCrime Newsगुन्हेगारी