शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नात्याला काळीमा! वडिलांचा मुलीवर बलात्कार; बहिणीची 'ती' ऑडिओ क्लिप ऐकल्यावर भावाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 12:40 IST

Crime News : पीडितेच्या भावाला बहिणीवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळाल्यानंतर त्याने आत्महत्या केली आहे.

नवी दिल्ली - राजस्थानमधील जालौरे जिल्ह्यामध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. जन्मदाता बापच हैवान झाला असून आपल्या मुलीवर बलात्कार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या भावाला बहिणीवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळाल्यानंतर त्याने आत्महत्या केली आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. बहिणीवर वडिलांनीच केलेला अत्याचार सहन न झाल्याने भावाने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करुन जीवन संपवलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व धक्कादायक प्रकार आपल्या एका नातेवाईकाला सांगितला. 

नातेवाईकाने मुलीसोबत घडलेल्या प्रकाराची एक ऑडिओ क्लिप तयार केली. ही ऑडिओ क्लिप मुलीच्या भावाने ऐकली. त्यानंतरच त्याने आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवलं. शनिवारी ही 32 मिनिटांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. मात्र त्याच दिवशी या मुलीच्या भावाने नर्मदा नदीच्या कालव्यात उडी मारुन आत्महत्या केली. आपल्या केलेल्या कृत्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहचल्याचं समजताच आरोपी पित्याने आपल्या राहत्या घरातून पळ काढला. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. 

जन्मदाता बापच झाला हैवान, केला बलात्कार

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये या मुलीने मोबाईल घेऊन देतो असं सांगून आपल्याला कारमध्ये नेलं आणि तिथे वडिलांनीच आपल्यावर बलात्कार केल्याचं सांगितलं आहे. मात्र बलात्काराची ही घटना नेमकी कधी घडली यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही. तसेच या क्लिपमध्ये ही पीडित मुलगी त्या दिवशी तिच्या आईने हिच्या भावालाही सोबत घेऊन जा असं आरोपीला सांगितलं होतं मात्र त्यांनी याला नकार दिल्याचंही म्हटलं आहे. तसेच या ऑडिओ क्लिपमध्ये पीडितेने यापूर्वीही तिच्या वडिलांनी तिचं लैंगिक शोषण केल्याचं म्हटलं आहे. 

पोलीस या प्रकरणाचा करताहेत तपास

मी झोपेत असायचे तेव्हा ते माझ्यावर लैंगिक अत्याचार करायचे असं या मुलीने म्हटलं आहे. माझे वडील मला एकटीला कधी बाहेर जाऊ द्यायचे नाही तसेच ते कुटुंबातील इतर व्यक्तींशी मला बोलूही द्यायचे नाहीत असंही या मुलीने म्हटलं आहे. वडिलांच्या या वागण्याला कंटाळून एकदा आपण त्यांना विरोध करताना त्यांच्यावर ओरडल्यानंतर आईने आपल्यालाच दम भरल्याची आठवणही या मुलीने ऑडिओ क्लिपमध्ये सांगितली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू