शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: प्रेयसीच्या लग्नात प्रियकराचा धुडगूस, वराच्या हातून माळ खेचत वधूच्या गळ्यात घातली, कुंकूही लावले, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 16:21 IST

Crime News: वधू-वरांनी एकमेकांना वरमाला घालण्यापूर्वीच वधूचा प्रियकर स्टेजवर आला. त्याने वराच्या हातून माळ काढून घेत ती प्रेयसी असलेल्या वधूच्या गळ्यात घातली. एवढ्यावरच तो थांबला नाही. त्यानंतर त्याने त्या वधूच्या डोक्यावर कुंकूही लावले.

पाटणा - लग्नसराईच्या दिवसांमध्ये लग्नसोहळ्यांमध्ये आधीच्या प्रेमप्रकरणातून घडलेले धक्कादायक किस्से समोर येत आहेत. अशीच एक विचित्र घटना बिहारमधील एरई गावात घडली आहे. येथे वधू-वरांनी एकमेकांना वरमाला घालण्यापूर्वीच वधूचा प्रियकर स्टेजवर आला. त्याने वराच्या हातून माळ काढून घेत ती प्रेयसी असलेल्या वधूच्या गळ्यात घातली. एवढ्यावरच तो थांबला नाही. त्यानंतर त्याने त्या वधूच्या डोक्यावर कुंकूही लावले.

पाटणामध्ये घडलेली ही घटना गेल्या सोमवारची असल्याचे सांगण्यात येत आहे. ऐन लग्नसोहळ्यात घडलेली ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान, लग्नसोहळ्यास उपस्थित असलेल्या वऱ्हाडी मंडळींनी प्रियकराला बेदम मारहाण केली. मात्र वधूने तिच्या प्रियकराला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यानंतर ग्रामस्थांनी या प्रियकराला पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच झाल्या प्रकारामुळे संतप्त झालेले वऱ्हाडी लग्न न लावताच निघून गेले.

या तरुणीच्या वडिलांनी तिचा विवाह नवादा जिल्ह्यतील जवाहरनगरमधील रहिवासी असलेल्या दिवाकर पांडेय यांचा मुलगा अक्षय कुमार याच्याशी निश्चित केला होता. सोमवारी रात्री वरात बँडबाजासह गावात पोहोचली. ११ च्या सुमारास जयमाला घालण्याची तयारी सुरू होती. यादरम्यान वधूच्या सांगण्यावरून तिचा प्रियकर अमित कुमार हा अचानक लग्नस्थळी स्टेजवर आला. त्याने फिल्मी स्टाईलमध्ये वराकडून माळ खेचत वधूच्या गळ्यात घातली. त्यानंतर तिच्या डोक्यावर कुंकूही लावले.

मात्र या घटनेबाबत वधूच्या नातेवाईकांना पोलिसांकडे कुठल्याही प्रकारची लेखी तक्रार दिलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी सदर तरुणाला पीआर बाँडवर मुक्त केले. लग्नसोहळ्यादरम्यान घडलेल्या या अजब घटनेची संपूर्ण परिसरामध्ये चर्चा सुरू आहे.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नBiharबिहार