Crime News: कपडे वाळत घालण्यावरून झालेल्या वादातून कोयत्याने हल्लाहल्लेखोरास अटक
By जितेंद्र कालेकर | Updated: January 17, 2023 22:17 IST2023-01-17T22:17:24+5:302023-01-17T22:17:57+5:30
Crime News:

Crime News: कपडे वाळत घालण्यावरून झालेल्या वादातून कोयत्याने हल्लाहल्लेखोरास अटक
ठाणे : कपडे वाळविण्याच्या कारणावरून आपल्या पत्नीशी वाद का घालता, असा सवाल करणाऱ्या दत्तात्रेय कृष्णा जाधव (५०, रा. शिवाजीनगर, वागळे इस्टेट, ठाणे) यांच्यावर त्यांचा शेजारी बाबू नायडू (५०, रा. शिवाजीनगर) याने कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. हल्लेखोराला अटक केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी मंगळवारी दिली.
ठाण्यातील वागळे इस्टेट शिवाजीनगर भागातील रहिवासी दत्तात्रेय यांची पत्नी आणि नायडू यांचे कपडे वाळत घालण्यावरून १६ जानेवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भांडण चालू होते. या भांडणाच्या आवाजामुळे घरात झोपलेले दत्तात्रेय हे बाहेर आले व त्यांनी नायडू यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचाच राग आल्याने नायडू यांनी त्यांना शिवीगाळ करून घरातील कोयत्याने त्यांच्या हातावर आणि डोक्यावर जबर वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. यात ते गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल शेळके यांच्या पथकाने सोमवारी रात्री आरोपी नायडू याला अटक केली. त्याला २० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.