शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

मोलकरणीला विवस्त्र करून मारलं अन्...; मेजरच्या पत्नीचा क्रूरतेचा कळस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 17:17 IST

या मोलकरणीला एवढी मारहाण करण्यात आली आहे की, तिचे दात आणि नाकाचे हाडही तुटले आहेत. एवढेच नाही तर, तिच्या शरिरावर भाजल्याच्या खुणाही आहेत.

आसाम मधील दिमा हसाओ येथून इंडियन आर्मीच्या मेजरला आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. या दाम्पत्यावर आपल्या घरातील अल्पवयीन मोलकरणीला मारहाण केल्याचा आरोप आहे. संबंधित मोलकरीण मारहाणीत गंभीर जखमी झाली आहे. या मोलकरणीला एवढी मारहाण करण्यात आली आहे की, तिचे दात आणि नाकाचे हाडही तुटले आहेत. एवढेच नाही तर, तिच्या शरिरावर भाजल्याच्या खुणाही आहेत.

माध्यमांतील वृत्तांनुसार, पोलीस सुत्रांनी म्हटले आहे की, संबंधित 16 वर्षीय मोलकरणीच्या जीभेवर कापल्याच्या खुणा आहेत. तसेच तिला जास्तित जास्त वेळ विवस्रच ठेवले जात होते. 

कचऱ्यातलं अन्न दिलं, रक्त चाटायलाही भाग पाडलं - माध्यमांतील वृत्तांनुसार, संबंधित अल्पवयीन मोलकरणीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणाही आहेत. संबंधित ताम्पत्य तिला  गेल्या 6 महिन्यांपासून त्रास देत होते. तिला केवळ मारहाणच केली गेली नाही, तर काही दिवस उपाशीही ठेवले गेले. ती जेव्हा जेवण मागत होती, तेव्हा तिला कचऱ्यातील अन्न दिले जात होते. एवढेच नाही, तर हे दाम्पत्य तिला विवस्त्र करून रक्त निघेपर्यंत मारहाण करत होते. कळस म्हणजे, तिला तिचेच रक्त चाटण्यासाठीही भाग पाडले जात होते, असे पीडितेने म्हटले आहे.

POCSO कायद्यांन्वये गुन्हा दाखल -यासंदर्भात पोलिसांनी आरोपी दाम्पत्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पीडिता पायऱ्यांवरून पडल्यामुळे जखमी झाल्याचे दाम्पत्याचे म्हणणे आहे. पोलिसांनी मारहाण आणि बेकायदेशीर मजुरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मेजरने पीडितेला हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथून आणले होते. मेजर तेथेच तैनात आहे. पीडितेने आसाममध्ये आल्यानंतर आपल्या कुटुंबीयांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. 

टॅग्स :AssamआसामCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसIndian Armyभारतीय जवान