शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! प्रेमात धोका मिळाल्याने प्रेयसीने काटा काढला; साखरपुड्याच्या दिवशी प्रियकराचा गळा चिरला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 17:43 IST

Crime News : प्रेयसीने आपला भाऊ आणि त्याच्या दोन मित्रांच्या मदतीनं साखरपुड्याच्याच दिवशीच प्रियकराची गळा चिरून हत्या केली आहे.

नवी दिल्ली - प्रेमात धोका मिळाल्याने एका प्रेयसीने टोकाचं पाऊल उचललं आहे. थेट प्रियकराचाच काटा काढला आहे. प्रियकराचं लग्न ठरल्यामुळे नाराज झालेल्या महिलेने त्याची हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून याचा अधिक तपास सुरू आहे. प्रेयसीने आपला भाऊ आणि त्याच्या दोन मित्रांच्या मदतीनं साखरपुड्याच्याच दिवशीच प्रियकराची गळा चिरून हत्या केली आहे. यानंतर महिलेने प्रियकराचा मृतदेह एका नाल्यात फेकून दिला होता. पण मृतदेह तरंगत बाहेर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील सांगीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावचा रहिवासी असणाऱ्या राजेंद्र वर्मा याचं मागील काही दिवसांपासून रामनगर भोजपूर येथील सोना देवी नावाच्या विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू होते. पण काही दिवसांपूर्वी राजेंद्रचं लग्न ठरलं होतं. त्याचा साखरपुडाही होणार होता. पण आपल्या प्रियकराचं लग्न होतंय हे समजल्यावर सोना देवी राजेंद्रवर अत्यंत नाराज झाली होती. प्रेमात धोका मिळाल्याने तिने आपला भाऊ आणि त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीनं राजेंद्रच्या हत्येचा कट रचला.

प्रियकराचं लग्न ठरल्याने नाराज प्रेयसीने टोकाचं पाऊल उचललं

साखरपुडा आणि लग्न याची तयारी करण्यासाठी राजेंद्र आपल्या घरी जाण्यासाठी निघाला होता. तो ज्यावेळी निघाला तेव्ही सोना देवीने त्याला भेटण्यासाठी बोलावलं. आरोपींनी राजेंद्र याला लखनऊ येथून आपल्या चारचाकी गाडीत बसवलं होतं. सोना देवीचा भाऊ आणि त्याचे अन्य दोन मित्र या गाडीत आधीपासूनच बसले होते. गाडीत बसून काही अंतर जाईपर्यंत सर्व काही ठिक होतं. पण काही अंतर दूर गेल्यानंतर प्रेयसी सोना देवी, तिचा भाऊ आणि अन्य दोन साथीदारांनी राजेंद्रची गळा चिरून हत्या केली.

प्रेमात धोका मिळाल्याने 'त्यालाच' संपवलं

आरोपींनी त्यानंतर एका नाल्यात राजेंद्रचा मृतदेह टाकून घटनास्थळावरून पळ काढला. घटनेच्या तीन दिवसांनी राजेंद्र याचा मृतदेह नाल्यात आढळला. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता सोना देवीबाबत माहिती मिळाली. तिला अटक करण्यात आली. तिने प्रेमात धोका मिळाल्याने आपणच हत्या केल्याची कबुली दिली आहे. तसेच तिच्या साथीदारांना देखील अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndiaभारतPoliceपोलिसArrestअटक