Crime News: ओशिवरा पोलिसांच्या तावडीतून आरोपी पसार
By गौरी टेंबकर | Updated: October 6, 2022 15:22 IST2022-10-06T15:22:05+5:302022-10-06T15:22:42+5:30
Ctime News:

Crime News: ओशिवरा पोलिसांच्या तावडीतून आरोपी पसार
- गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई: ओशिवरा पोलिसांच्या तावडीतून एक आरोपी पसार झाला आहे. गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद बाबू पवार (२६) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला बुधवारी पोलिसांसोबत धक्कबुकी केल्या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अटक केली होती. त्यानुसार गुरुवारी त्याला अंधेरी कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यावेळी त्याला न्यायालयात नेण्यासाठी ओशिवरा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याला ditection रूम कडे अंमलदार घेऊन जात असताना तो तिथून सटकला आणि पोलीस ठाण्यातून पसार झाल्याची माहिती आहे. पवार हा जोगेश्वरीच्या बेहराम बागमध्ये विकास नगरच्या नेपाळी चाळीत राहतो. त्यानुसार त्याच्या घरा सह शहरात सर्वत्र त्याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच घटनास्थळीचे सीसीटिव्ही फुटेज पडताळत स्थानिक खबऱ्याना देखील सतर्क करण्यात आले आहे. त्यानुसार लवकरच त्याला अटक करण्यात पोलिसांना यश येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.